शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने

By अजित मांडके | Updated: December 22, 2022 18:28 IST

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.

- अजित मांडकेठाणे -  मुख्यमंत्र्यांनी केलेला जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी पटलावर नसलेले विषय सभागृहात आणून निर्वाचित लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन करण्यात आले. त्य निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "तख्त बदल दो, ताज बदल दो ; गद्दारो  का राज बदल दो, निर्लज्ज सरकारचा निषेध असो, ईडी सरकार मुर्दाबाद,  पन्नास खोके -एकदम ओके, लोकशाहीचा गळा घोटणार्या सरकारचा निषेध  असो" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  यावेळेस कार्यकर्त्यांकडून चक्क खोके आणले होते.

या प्रसंगी आनंद परांजपे यांनी, हे सरकार आपल्या बहुमताचा गैरवापर करीत आहे. महापुरूषांवरील अश्लाघ्य टीकेला आणि त्यांच्या बदनामीला हे सरकार सहज घेत आहे. महापुरूषांची बदनामी होत असताना हे सरकार शांत होते. मात्र, आता जो विषय पटलावर नाही; त्या विषयावर चर्चा घडवून मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आमचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सभागृहात मांडणार होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी 14 वेळा सभागृह बंद पाडले. सत्ताधारी पक्षातील 14 सदस्य सभागृहात बाजू मांडत असताना विरोधकांच्या एकाही सदस्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही. त्या विरोधात माईक बंद असताना केलेले भाष्य इतिवृत्तात आणून जयंत पाटील यांचे निलंबन केले जात असेल तर ही हुकूमशाहीची नांदी आहे. लोकशाहीचा गळा  घोटण्याचा हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही; त्या विरोधात आम्ही संघर्ष करू, असा इशारा दिला.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटील