शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

हायटेक योजनांसाठी शिक्षण विभागाची कोट्यवधींची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:16 IST

पटसंख्येत घट होत असतानाही त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध नवनवीन योजनांचा फंडा आणून कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे.

ठाणे : ठाणे महापालिका शाळांची अवस्था दयनीय असताना, पटसंख्येत घट होत असतानाही त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून विविध नवनवीन योजनांचा फंडा आणून कोट्यवधींची उधळण करण्याचा घाट घातला जात आहे. परंतु, या योजना कितपत यशस्वी होणार, याबाबत शंका उपस्थित केल्या जात असून यावरून शुक्रवारच्या महासभेत वादंग निर्माण होणार आहे.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या यापूर्वी ३७ हजारांच्या वर होती. आजघडीला ती २७ ते २८ हजारांच्या घरात आली आहे. काही शाळांची अवस्था दयनीय आहे. शौचालयांना कडीकोयंडा नाही. दाटीवाटीने भरणारे वर्ग, धोकादायक असलेल्या शाळांच्या इमारती अशा परिस्थितीत अनेक शाळा आहेत. असे असताना या सुविधा देण्याऐवजी हायटेक योजना राबवून त्यातून मलिदा लाटण्याचा प्रकार शिक्षण विभागाकडून सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार, महापालिका मराठी माध्यमाच्या शाळांतील अमराठी, परप्रांतीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गरज लक्षात घेऊन स्कॅफहोल्डिंग ही योजना राबवण्यात येणार आहे. महापालिका शाळांमध्ये ६१७६ अमराठी विद्यार्थी आहेत. त्यानुसार, या योजनेंतर्गत त्यात्या भाषेतून सेवानिवृत्त झालेल्या मात्र मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना शाळेमध्ये १० हजार मानधनावर ठेवण्यात येणार आहे. यासाठी ५० ते ६० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक याप्रमाणे ९० सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी ९० लाखांचा खर्च दरवर्षी केला जाणार आहे.तर, झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांसाठी गल्ली आर्ट स्टुडिओची निर्मिती केली जाणार असून यात किती विद्यार्थी सहभागी होतील, यावर आतापासूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. उद्याची महासभा वादळी ठरणार असल्याने याकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.>अंध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना केवळ चांगल्यादीपस्तंभ शाळा योजनाही राबवण्यात येणार असून त्यानुसार प्रत्येक शाळेने शाळेसभोवतालचा १०० मीटर परिसर दत्तक घेऊन त्या परिसराची देखभाल करावी. एकही मूल शाळाबाह्यराहणार नाही, याची काळजी घेणे, आदींसह इतर कामे केली जाणार आहे. त्यानुसार, ज्या शाळा यात यशस्वी होतील, त्यांना प्रत्येकी ५० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यानुसार, यासाठी २५ लाखांची तरतूद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अंध विद्यार्थ्यांसाठी संभाषणकौशल्य, कॉलसेंटर कामकाज प्रशिक्षण, मसाज, संगणक प्रशिक्षण, रोजगार प्रशिक्षण आदी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातल्या त्यात ही योजना चांगली म्हणावी लागणार आहे. इतर योजनांचा मात्र पुरता बोजवारा उडणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांसाठीची योजना वगळता इतर योजनांवरून आजच्या महासभेत वादंग निर्माण होणार असल्याचे दिसत आहे. महापालिका क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शहर वैविध्यता दर्शन योजनेंतर्गत ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांना तसेच महापालिकेच्या सामाजिक दीपस्तंभ शाळा या योजनेतील ५० शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ठाणे शहराचा भौगोलिक इतिहास तसेच शहरातील विविध कला व संस्कृतींची ओळख व शहरातील विविधतेचे दर्शन घडवण्यासाठी परिवहनसेवेच्या सहकार्यातून ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी तब्बल एक कोटींचा चुराडा केला जाणार आहे. हॅप्पीनेस इंडेक्स वाढविणे या योजनेखाली मोबाइल लायब्ररी या प्रकल्पांतर्गत महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी फिरती लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीसुद्धा एक कोटीचा चुराडा केला जाणार आहे. दप्तराचे ओझे कमी करणे, ही योजना १ ली ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत सर्व विषयांचे एकच मासिक पुस्तक याप्रमाणे महिनावार अभ्यासक्रमानुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. दोन वर्षांसाठी या योजनेसाठी तीन कोटी तीन लाख ७७ हजार आठ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.