शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील मिलियन प्लस नऊ शहरे होणार प्रदूषणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 02:19 IST

Thane News : पंधराव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील मिलियन प्लस आणि नॉन मिलियन शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासह हवा गुणवत्ता राखण्यासाठी केंद्र शासनाने २०२०-२१ या वर्षासाठी २८०६ कोटी इतका भरमसाट निधी मंजूर केला

- नारायण जाधव ठाणे : पंधराव्या वित्त आयोगाने विविध कामांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी केंद्र शासनाने देशभरातील शहरांची मिलियन प्लस आणि नॉन मिलियन शहरे अशी वर्गवारी केली असून यात ठाणे जिल्ह्यातील तब्बल नऊ शहरांचा मिलियन प्लस अर्थात १० लाख लोकसंख्येवरील शहरांमध्ये समावेश केला आहे.पंधराव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्रातील मिलियन प्लस आणि नॉन मिलियन शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासह हवा गुणवत्ता राखण्यासाठी केंद्र शासनाने २०२०-२१ या वर्षासाठी २८०६ कोटी इतका भरमसाट निधी मंजूर केला असून यात मिलियन प्लस शहरांचा वाटा १५८६ कोटी इतका असल्याने जिल्ह्यातील नऊ शहरांना कोट्यवधी रुपये मिळून त्यांची जीवघेण्या प्रदूषणातून सुटका होणार आहे. 

ही आहेत ठाणे जिल्ह्यातील नऊ शहरे 

महाराष्ट्रातील मिलियन प्लस शहरांसाठी केंद्र शासनाने मुंंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि वसई-विरार असे गट तयार केले आहेत. यात मुंबई गटात मुंबई महापालिकेसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, भिवंडीसह अंबरनाथ आणि बदलापूरचा समावेश आहे. विशेष म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार १० लाखांवर लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असला, तरी जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली ही तीन शहरे तेव्हा १० लाखांवर होती. उर्वरित शहरे त्याखालील लोकसंख्येची होती. तरीही त्यांची मिलियन प्लस शहरांमध्ये केंद्राने निवड केली आहे. 

यानुसार मिळणार अनुदान : राज्यातील या मिलियन प्लस शहरांसाठी जे १५८६ कोटी इतके अनुदान मिळणार आहे, त्यात घनकचरा व्यवस्थापनासह हवा गुणवत्ता राखण्यासाठीच्या अनुदानाचा वाटा प्रत्येकी ७९३ कोटी इतका आहे. ते राज्यातील मिलियन प्लस शहरांना कशाप्रकारे वितरित करावे, याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे नंतर करण्यात येणार आहेत. परंतु, नॉन मिलियन प्लस शहरांचे १२२० कोटींचे अनुदान मात्र त्या शहरांची लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार देण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेpollutionप्रदूषण