शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या धोकादायक इमारतीतील कार्यलयांचे अन्यत्र स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 19:10 IST

धोकादायक इमारत पाडून त्या जागी भव्य मोठी इमारत बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या वास्तुंमध्ये या कार्यालयांचे सध्यास्थितील स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या धोकादायक इमारतीमधील अर्थ विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवासी इमारतीच्या खाली तयार केलेल्या तळमजल्याच्या जागेवर थाटला जात आहे.

ठळक मुद्देआॅडीट रिपोर्टही प्राप्तखाली करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषदेच्या प्रशासनस मिळालाच नाहीचरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमधील दोन सभागृहांची पाहाणी

ठाणे : जिल्हा परिषदेची मुख्य इमारत मागील दीड वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषीत करण्यात आली आहे. तसा ट्रक्चर आॅडीट रिपोर्टही प्राप्त झालेला आहे. मात्र इमारत आज, उद्या खाली करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषदेच्या प्रशासनस मिळालाच नाही. अखेर पावसाळा जवळ आला, त्यात फॅनी वादळाची सुरू असलेली दहशत लक्षात घेऊन या इमारतीमधी बहुतांशी विभागांनी आता अन्यत्र स्थलांतरीत होण्यास प्रारंभ केल्याचे निदर्शनात आले आहे.धोकादायक इमारत पाडून त्या जागी भव्य मोठी इमारत बांधण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. तत्पुर्वी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जुन्या वास्तुंमध्ये या कार्यालयांचे सध्यास्थितील स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या धोकादायक इमारतीमधील अर्थ विभाग पदाधिकाऱ्यांच्या निवासी इमारतीच्या खाली तयार केलेल्या तळमजल्याच्या जागेवर थाटला जात आहे. ग्राम पंचायत विभाग महिला बालकल्याण विभागाच्या तळमजल्यात सुरू होईल. येथील एमआरईजीएसचे कार्यालय अन्यत्र जाणार आहे. अस्थापना विभाग आरोग्य विभागाच्या इमारतीत स्थलांतरीत होईल, तर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय समाजकल्याण विभागाच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या तळमजल्यावरील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय, एमआरईजीएस आणि बांधकाम विभागाची इमारत व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या इमारतीत जात आहे.जिल्हा परिषद अध्यक्षांसह, सर्व सभापतींचे दालन त्यांच्या निवासस्थानाच्या इमारतींमध्ये थाटले जाईल. या धोकादायक इमारतीला या आधीच खाली करणे अपेक्षित होते. पण त्यास विलंब झाला. विषाची परीक्षा नको म्हणून या इमारतीमधील कार्यालये अन्यत्र शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालात सोनवणे यांनी सांगितले. या सर्व कार्यालयाना एका इमारतीत शिफ्ट करण्याच्या दृष्टीने चरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमधील दोन सभागृहांची पाहाणी केली आहे. त्यांचे भाडे निश्चित करून तसा जिल्हा परिषदेचा ठराव घेतला जाईल. त्यास राज्य शासनाची मंजुरी घेऊन या एमटीएनएलच्या इमारतीमध्ये जिल्हा परिषदेची कार्यालये सुरू करण्याच्या प्रयत्न असल्याचे ही सोनवणे यांनी निदर्शनात आणून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद