शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालसारखा हिंसाचार देशाच्या अन्य राज्यातही भडकणार?; केंद्र सरकार अलर्ट
2
Arjun Tendulkar IPL 2025: Mumbai Indians खेळायची संधी देईना, त्याचदरम्यान अर्जुन तेंडुलकरची इन्स्टा स्टोरी चर्चेत
3
डोनाल्ड ट्रम्प फोडणार आणखी एक बॉम्ब; २० एप्रिलनंतर अमेरिकेत काय घडणार? लोक चिंतेत
4
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
5
दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; चिमुरात तणाव, जमावाची पोलीस ठाण्यावर दगडफेक, आरोपी अटकेत
6
लखनौमध्ये रुग्णालयाला मध्यरात्री लागली भीषण आग, प्रसंगावधान दाखवत असे वाचवले २०० रुग्णांचे प्राण   
7
26/11 Mumbai Attack: तहव्वूर राणाची एनआयएकडून रोज ८-१० तास कसून चौकशी, हल्ला होण्यापूर्वी तो कुठे-कुठे फिरला?
8
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
9
लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."
10
आजचे राशीभविष्य - १५ एप्रिल २०२५, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस
11
Palghar: पाणीटंचाईने प्रचंड हाल! हंडाभर पाण्यासाठी महिलांना जागावी लागते रात्र
12
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
13
लेख: ‘राज ठाकरेंच्या घरासमोर माझ्या मुलाने दहा कोटींचा फ्लॅट घेतलाय!’
14
तेलंगणात अनुसूचित जाती वर्गीकरण लागू; अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य
15
राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे
16
जगभर : बराक ओबामा आणि मिशेल यांच्यात काही बिनसलंय का?
17
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय
18
तारीख पे तारीख... उशिराचा न्याय हादेखील अन्यायच होय!
19
Sankashti Chaturthi 2025: यंदा संकष्टीला म्हणा 'ही' आगळी वेगळी तरी सुरेल गणेश आरती!
20
ठाण्यातील उद्योजकांना खंडणीसाठी धमक्या ! पुण्यानंतर ठाण्यातही ‘माथाडीं’च्या नावाखाली छळवणूक

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय झाले स्थलांतरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:49 IST

इमारत धोकादायक; नव्या कार्यालयाच्या भाड्यापोटी भुर्दंड

शेणवा : शहापूर प्रकल्प विभागाच्या कार्यालयाची इमारत निकृष्ट बांधकामामुळे धोकादायक झाल्याचे स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये उघड झाल्याने हे कार्यालय शहरातील नव्या इमारतीत तत्काळ स्थलांतरित केले आहे. या कार्यालयाच्या भाड्यापोटी आदिवासी विकास विभागाच्या तिजोरीवर दीड लाखांचा भार पडणार आहे. यामुळे टीका होत आहे.आदिवासी विकास विभागाच्या निधीतून लाखो रु पये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१० मध्ये बांधलेल्या प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि कंत्राटदाराने निकृष्ट बांधकाम केल्याने या इमारतीची नऊ वर्षांतच पडझड झाली आहे. निकृष्ट बांधकामामुळे भिंतींना भेगा पडल्या असून इमारतीसाठी वापरण्यात आलेला स्टीलही गंजले आहे. भिंतीचे प्लास्टरही ठिकठिकाणी निखळले आहे. इमारतीच्या छपराच्या स्लॅबला गळती लागली. या धोकादायक स्थितीतही जीव मुठीत घेऊन कर्मचारी काम करत होते. या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यानंतर इमारत धोकादायक असल्याचे उघड झाले. यानंतर तत्काळ आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी ठाणे आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्तांना लेखी पत्र देऊन शहापूर आदिवासी प्रकल्प विभागाची इमारत धोकादायक असल्याची माहिती कळवली होती. याबाबत आदिवासी प्रकल्प अधिकारी अरु णकुमार जाधव यांनी ठाणे अप्पर आयुक्तांकडे भाडेतत्त्वावर जागा घेऊन कार्यलय स्थलांतरित करावे लागेल, असे पत्र दिले होते. या मागणीनंतर हे कार्यालय शहापूर शहारातील एका नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. या इमारतीतील जागेचे भाडे बांधकाम विभागाने ठरवलेल्या शासकीय भाडे दरानुसार एक लाख ४० हजार रु पये आहे. यासाठी पाच वर्षांचा भाडेतत्त्वाचा करार करण्यात आला आहे. आदिवासी प्रकल्प इमारतीच्या निकृष्ट कामाचा नाहक फटका आदिवासी विकास विभागाला सोसावा लागणार आहे.कार्यालयाची इमारत धोकादाय असल्याने भाड्याने जागा घेण्यात आली आहे. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या कार्यालयाचे भाडे हे शासकीय दरानुसार दरमहा एक लाख ४० हजार रु पये आकारण्यात आले आहे .- व्ही .आर .गायकवाड,सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासक), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर