शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर शहराला होणारा एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तासांसाठी बंद

By धीरज परब | Updated: June 25, 2024 20:25 IST

Mira Road: मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २८ जून रोजी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे. 

 मीरारोड - मीरा भाईंदर शहराला होणारा एमआयडीसी चा पाणी पुरवठा शुक्रवारी २८ जून रोजी २४ तासांसाठी दुरुस्तीच्या कामा मुळे बंद राहणार आहे.  मीरा भाईंदर शहरास स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता २४  तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. 

त्यामुळे गुरुवार दि.  २७ जून रोजी रात्री १२ वा. ते शुक्रवार दि.  २८ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यत असा २४ तासांसाठी एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. ह्या दरम्यान स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा सुरु राहणार आहे.

परंतु एम.आय.डी.सी. प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा पुर्ववत होईपर्यत मीरा-भाईंदर शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होणार आहे.  त्यामुळे नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे . तर २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांना त्या नंतर देखील दोन ते तीन दिवस पाणी टंचाई सहन करावी लागणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणीmira roadमीरा रोड