शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मेट्रो कारशेडच्या बेडूकउड्या ; दहिसरची कारशेड जाणार भाईंदरला, तर कोनची कशेळीला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 07:41 IST

Metro : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत.

- नारायण जाधव

ठाणे : महामुंबई क्षेत्रात विविध शहरात १२ मेट्रो मार्ग आकार घेत असून या मेट्रो मार्गांसाठी आवश्यक असलेल्या कारशेड उभारण्याबाबत एमएमआरडीला वांरवार कोलांटी मारावी लागत आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून आरे कॉलनीतील कारशेड कांजूरमार्ग येथे मिठागरांच्या जमिनीवर हलविण्याच्या निर्णयावर केंद्र आणि राज्य शासनात वाद पेटलेला एकीकडे पेटलेला असताना दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील कारशेड उभारण्याबाबतही एमएमआरडीएला वारंवार बेडूक उड्या माराव्या लागल्या आहेत.

ठाण्यातील कावेसर, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, भिंवडीतील कोन-गोवे येथील कारशेड उभारण्याचा निर्णय बदलल्यानंतर मुंबईतील दहिसर येथील प्रस्तावित कारशेड आता ठाणे जिल्ह्यातील भाईंदरच्या राई-मुर्धे गावात आणि कोन येथील कारशेड कशेळी गावांत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे उघडकीस आले आहे.

एमएमआरडीएच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मेट्रो कारशेडची जागा वारंवार बदलण्या मागे किंवा आधी कोणती शेड उभारावी, याबाबत पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचे अंतरासाठी कोणते ठिकाण हे सोयीचे ठरेल, याचे कारण देण्यात आले आहे. ठाण्यातील कोपरी आणि मोघरपाडा येथेही सुरुवातीपासूनच विरोध आहे. यामुळे उद्या हे निर्णयही बदलावे लागण्याची भीती आहे.

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार... - मेट्रो मार्ग क्रमांक २ अ, २ ब, ४, ७ साठी दहिसरला २३.४५ हे. जागा आरक्षित.  - १७.४७ हेक्टर विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीची. त्याच्या बदल्यात गोराईतील ४० एकर जागेची अदलाबदल करण्याचा करारही झाला.- मेट्रो ९ व ७ असाठी भाईंदरच्या राई-मुर्धे गावात ३२ हेक्टर आरक्षित जागेवर  आता दहिसर येथील कारशेड रद्द करून ते उभारण्याचा निर्णय. - ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोची कारशेड कोन एमआयडीसी नजीकच्या गोवे येथील १६ जागांवरील कारशेड आता कशेळी येथे बांधण्यास मंजुरी.- कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील कारशेडसह कास्टिंग यार्डला विरोध होत आहे. - ठाण्यातील कोपरी आणि मोघरपाडा येथेही सुरुवातीपासूनच विरोध आहे. यामुळे उद्या हे निर्णयही बदलावे लागण्याची भीती आहे.- कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरील कारशेडसह कास्टिंग यार्डला विरोध होत आहे.

संचालक मंडळाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह- कोट्यवधी रुपये मोजून या सर्व मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल जागतिक स्तरावरील संस्थांकडून तयार केला आहे. - पर्यावरण अहवालावर कोट्यवधी रुपये मोजले आहेत. त्यांना मंजुरी देताना डझनभर अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले. - अचानक कारशेडची जागा बदलल्याने मेट्रोच्या विकासात अडथळे निर्माण होत आहेत. सविस्तर प्रकल्प अहलवालातच कोणता मार्ग, किती अंतराचा टप्पा आधी पूर्ण होईल, हे नमूद असताना मेट्रो मार्ग आणि कारशेडला अधिकाऱ्यांनी कशी मंजुरी दिली? जागा बदलामागे बिल्डर हित आहे, हे लक्षात आले नाही का? असे अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर निर्माण झाले आहेत.

 

टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे