शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनातून दिला 'पर्यावरण रक्षणा'चा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 14:05 IST

कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले असून त्याद्वारे 'पर्यावरण रक्षणाचा' महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

कल्याण  - आतापर्यंत आपण मोठमोठ्याला विद्यार्थ्यांनी सादर केलेले अनेक वैज्ञानिक प्रयोग पाहिले असतील. मात्र कल्याणच्या बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले असून त्याद्वारे 'पर्यावरण रक्षणाचा' महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. कल्याण पश्चिमेतील बालक मंदिर प्राथमिक शाळेत हे विज्ञान प्रदर्शन भरले असून शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

या विज्ञान प्रदर्शनात एक दोन नव्हे तर तब्बल 150 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग या बाल वैज्ञानिकांनी सादर केले आहेत. त्यामध्ये सौरऊर्जा, बायोगॅस, पवन ऊर्जा, जलशुद्धीकरण, पदार्थांचे गुणधर्म, इलेक्ट्रिक, भिंगाचा उपयोग, ध्वनी, कृत्रिम आणि कंपोस्ट खत, ग्रहांची माहिती, हवा, हावडा ब्रिज, जलचक्र, घरे, वाहतुकीची साधने, संदेश वहनाची साधने, इंधनाचे प्रकार आणि त्यापासून होणारे प्रदूषण, खेळातून विज्ञान आदी विविध विषयांवर आधारित उत्तमोत्तम प्रयोगांचा समावेश आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे प्रदर्शन सर्वाना पाहण्यासाठी खुले असणार आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे महाराष्ट्रातील बहुधा पहिलेच विज्ञान प्रदर्शन आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यातून देशाला नवे वैज्ञानिक मिळावे या उद्देशातून बालक मंदिर शाळेतर्फे या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रकाश माळी, शालेय शिक्षण समितीचे प्रसाद मराठे, माजी आमदार प्रभाकर संत सर, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, पालक प्रतिनिधी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

टॅग्स :scienceविज्ञान