शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्याला फटका, राष्ट्रीय पातळीवरील क्रीडागुणांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:18 IST

राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधीश बारी या विद्यार्थ्याला सरकारी यंत्रणांमधील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - राष्ट्रीय स्तरावर रायफल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधीश बारी या विद्यार्थ्याला सरकारी यंत्रणांमधील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. त्याच्या क्रीडा प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रत तपासून त्या महाराष्ट्र रायफल असोसिएशनने (एमआरए) ठाण्याऐवजी पुण्याला पाठवल्याने अधीशला दहावीच्या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावरील गुणांपासून वंचित राहावे लागले आहे. ही सरकारी यंत्रणांची चूक दूर करून त्याला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे.दत्तनगर परिसरात राहणारा अधीश चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शिकत होता. चार वर्षांपासून तो रायफलचे प्रशिक्षण घेत असून दोन वर्षांपासून तो राष्टÑीय निवड चाचणीत प्रयत्न करत आहे. पेंढरकर महाविद्यालयातून तो रायफलचे प्रशिक्षण घेत आहे. अधीशचे वडील विनोद म्हणाले की, मार्चपर्यंत शाळेकडे प्रमाणपत्रे जमा करण्याची मुदत होती. शाळेने ही प्रमाणपत्रे डिस्ट्रिक्ट स्पोटर््स आॅफिसरकडे (डीएसओ) पाठवली.डीएसओकडे जिल्हास्तरीय खेळाडूंची यादी असते, त्यामुळे त्यांनी जिल्हास्तरीय कागदपत्रे ठेवून राष्ट्रीय पातळीवरील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती आणण्यास सांगितले. त्यानुसार, वरळी येथील एमआरएच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी ही कागदपत्रे आमच्याकडे न देता बोर्डाला पाठवतो, असे सांगितले. मात्र, त्यांनी ही कागदपत्रे ठाण्याला पाठवण्याऐवजी बालेवाडी (जि. पुणे) येथे पाठवली. त्यामुळे अधीशला जिल्हास्तरीय पाच क्रीडागुण मिळाले; पण राष्ट्रीय स्तरीय १० गुणांपासून तो वंचित राहिला.अधीश आणि त्याच्या कुटुंबीयांनी आॅनलाइन निकाल पाहिल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी बोर्डाकडे धाव घेतली असता बोर्डाने आता निकाल लागला असून फाइल जमा असती, तर गुण देता आले असते. पण, आता बदल करता येणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. बोर्डाच्या मते, शाळांनी एक प्रत डीएसओला आणि एक प्रत बोर्डाला देणे अपेक्षित होते. पण, शाळांकडून प्रमाणपत्रांची प्रमाणित प्रत आल्याशिवाय ते प्रत स्वीकारत नसल्याचे सांगितले जात असल्याचे बारी यांनी सांगितले. एमआरए कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.डीएसओला कागदपत्रे पाठवल्यावर त्यांनी जिल्हास्तरीय कागदपत्रे ठेवून राष्ट्रीय पातळीवरील कागदपत्रे प्रमाणित नसल्याने ती काढून टाकली. एमआरएने ती कागदपत्रे वेळेत डीएसओकडे पाठवण्याची गरज होती. आमच्या शाळेतील इतर खेळाडूंना क्रीडागुण व्यवस्थित मिळाले आहेत. अधीशच्या बाबतीत हा घोळ झाला आहे.- गुलाबराव पाटील, क्रीडाशिक्षक, चंद्रकांत पाटकर विद्यालय

टॅग्स :Studentविद्यार्थीdombivaliडोंबिवली