शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य  महत्त्वाचे- के.पी. रघुवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 16:51 IST

सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला.

डोंबिवली - सेवा निवृत्तीनंतर आयुष्यात पोकळी निर्माण होते. यासाठी जेष्ठांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपावे, असा सल्ला माजी पोलीस अतिरिक्त महासंचालक के.पी रघुवंशी यांनी दिला. रामकृष्ण माधव पाटील आणि ताराबाई रामकृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुवंशी बोलत होते. डॉ. अरुण पाटील यांच्या संजीवनी हॉस्पिटलच्या ३८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना रघुवंशी पुढे म्हणाले, शारीरिक आरोग्य महत्त्वाचे आहे.  त्यामुळे योगा, व्यायाम गरजेचा आहे. तरुणपिढीसोबत समन्वय साधतांना तुलना करू नये, असा सल्लाही रघुवंशी यांनी दिला. 

कायदेतज्ज्ञ शिरीष देशपांडे यांनी उपस्थितांना भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमानकाळ आनंदामध्ये जगा असा सल्ला दिला. यावेळी उत्कृष्ट पेन्शनर म्हणून श्रीधर राजाराम भुर्के यांचा सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट पेन्शनर दाम्पत्य म्हणून शरद नारायण भिडे आणि जया भिडे यांचा गौरव करण्यात आला. गेली आठ वर्ष हा पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षीपासून समाजसेविका ज्योती शंकर साटवणे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट चतुरस्त्र व्यक्तीमत्व पुरस्कार देण्यात येत आहे.  यावर्षीचा प्रथम पुरस्कार ज्योती गुप्ता हिला देण्यात आला.  यावेळी श्रृती शिंदेहिने दिव्यांसह योगाची प्रात्यक्षिके सादर केली. प्रविण मानकर, पल्लवी शेट्टी, शांताराम मनवे आदींचा, तसेच पोलीस अधिकारी रविंद्र वाडेकर यांचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

गायक गिरीष डोईफोडे यांनी गाणे सादर केले. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी पवार, डॉ. मंगेश देशपांडे, मनिष चितळे, एसीपी टकले, महाजन, दिलीप खन्ना, सुरेश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  डॉ. अरुण पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गिरीष डोईफोडे आणि अलोक काटदरे यांच्या गाण्यांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमासाठी दीपा बापट आणि संजीवनी हॉस्पिटलच्या कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.