शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरकरांनो नियमित मास्क घाला, महापालिकेचे आवाहन

By धीरज परब | Updated: December 25, 2022 17:21 IST

बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील नागरिकांना नियमित मास्क घालण्याचे आवाहन  केले आहे. पालिकेने कोरोना बाबत आढावा बैठक घेऊन विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानंतर अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर लहाने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. 

बैठकीत परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी कोरोना चाचणी त्वरित करून घ्यावी. शहरातील सर्व सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन त्यांच्या सोसायटीमध्ये जनजागृती करण्याचे ठरले. बंद करण्यात आलेले कोव्हिड सेंटर हे पुन्हा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात संबंधितांना दिल्या गेल्या. 

कोरोना पसरू नये म्हणून खबरदारीसाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोव्हिड बूस्टर डोस तसेच १८  वर्षांवरील नागरीकांकरिता लसीचे दोन्ही डोस पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. 

कोव्हिडबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करू नये अन्यथा कारवाई केली जाईल  पालिकेने दिला आहे. 

कोविशील्ड नसल्याने बूस्टर पासून नागरिक वंचित मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. शिवाय बूस्टर डोस सुद्धा दिला जात आहे. परंतु पालिके कडे कोविशील्ड ची लस नसल्याने पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर नागरिक बूस्टर डोस पासून वंचित आहेत. कोविशील्ड चा दुसरा डोस वा बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयात पैसे मोजून लस घेण्याची पाळी आले आहे.   शासना कडूनच कोविशील्ड लस आलेली नसल्याने ती आल्या नंतर पालिका केंद्रावर ती मोफत दिली जाईल असे पालिका सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक