शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
4
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
5
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मीरा-भाईंदर भाजपाची जाहिरात फलकांद्वारे 'गर्व है, जीवन हुआ खुशहाल' प्रचार मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:08 IST

मीरा-भाईंदर भाजपाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली प्रचार मोहीम जाहिरात फलकांच्या माध्यमातून सुरू केली आहे.

मीरा रोड - मीरा-भाईंदर भाजपाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली प्रचार मोहीम जाहिरात फलकांच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासाठी मुझे गर्व है असे घोषवाक्य वापरून पाणी, काँक्रिट रस्ते, उद्यान, मैदान, रुग्णालय, गॅस सिलिंडर आदी सुविधा मिळाल्याने जीवन सुखकर झाल्याचे नागरिकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. सद्या भाजपाचे हे जाहिरात फलक चर्चेचा विषय ठरले आहेत.२०१४ साली मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नरेंद्र मेहता आमदार म्हणून निवडून आले. त्या नंतर भाजपा - शिवसेना युतीच्या पहिल्या महापौर गीता जैन निवडून आल्या. तर २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपाने तब्बल ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता महापालिकेवर आणली. मीरा भाईंदर भाजपाचेच नव्हे तर महापालिकेचे देखील सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मेहता आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचे पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत. तर माजी महापौर गीता जैन यांनी देखील भाजपाच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी चालवली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी मीरा भाईंदरमध्ये सद्या भाजपाच्या जाहिरातींचे फलक चर्चेचा विषय ठरले आहेत. मुझे गर्व है असे बोधवाक्य वापरून भाजपाने शहरातील नागरिकांचे जीवन आम्ही कसे आनंदी आणि सुसह्य केले आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. या प्रचारासाठी भाजपाने शहरातील मुलांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, रिक्षाचालक आदींचा समावेश केलाय.भाजपाच्या सर्वच जाहिराती हिंदी भाषेत आहेत. अब सिमेंट के रास्ते , हम सबके वास्ते म्हणणारा काशिमीरा गाव येथे राहणारा रिक्षा चालक गुलाबचंद पाल याचे छायाचित्र फलकावर आहे. खेलकुद हुआ आसान , हमारे घर के पास मैदान असं बेव्हर्ली पार्कचा गौरांश चौहान म्हणतोय. गोल्डन नेस्ट येथे राहणाराया रोशनी थापर म्हणतात की, आता गॅस सिलिंडर आल्याने आमच्या घरात धूर नाही तर आनंद असतो. शांती गार्डनच्या स्मिता मोरे म्हणतात की, प्रत्येक घरात नळ आणि पाणी आहे. अब जीवन हुआ खुशहाल , शहर में बेहतर अस्पताल असे म्हणताना मीरा रोडचे ज्येष्ठ नागरिक दाम्पत्य रजनीकांत व रमाबेन पीथडिया फलकावर दिसतात.भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले की, २०१४ साली मीरा भाईंदरमधील जनतेला आमदार नरेंद्र मेहता यांनी जी आश्वासने दिली होती ती आम्ही पूर्ण करत असल्याबद्दलची ही प्रचार मोहीम आहे. जे आम्ही केले आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आहे. शहरात बंद असलेल्या नळ जोडण्या देणे पुन्हा सुरू केले तसेच ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना सुरू केली.शहरातील रस्ते आम्ही सिमेंटचे रस्ते बांधण्यास सुरुवात केली. आज भाईंदर पश्चिमेचा ६० फुटी मार्ग, जेसल पार्क, इंद्रलोक, नया नगर, काशिमीरा नाका हे रस्ते सिमेंटचे झालेत. उत्तन मार्गचे काम सुरू आहे. सिमेंट रस्त्यांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अन्य रस्ते देखील सिमेंट करणार आहोत. आमच्या काळात सर्वात जास्त उद्यानं आणि मैदानं विकसित केली आहेत. नव्याने अजून होणार आहेत. महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आम्हीच सुरू केले आहे. शासनाला हस्तांतरीत करायचा निर्णय झाला असून, शासन ते पूर्ण क्षमतेने चालवणार आहे असे म्हात्रे म्हणाले.आ. नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांच्या कार्यकाळात जी आश्वासनांची पूर्तता आम्ही केली त्याचाच प्रचार आम्ही करत असल्याचे म्हात्रे म्हणाले. तर शहरात सद्या २४ होर्डिंग्जवर भाजपाच्या या प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित केल्या असल्याचे भाजपाचे यशवंत आशिनकर म्हणाले.