शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्ये पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 04:05 IST

नागरिक त्रस्त : शटडाउननंतर ६५ तासांनी पुरवठा सुरळीत

मीरा रोड : सरकारने सुरू केलेल्या पाणीकपातीच्या झळा ऐन गारठ्यात मीरा भार्इंदरकरांना बसत आहेत. दर आठवड्यात ३० तासांची पाणीकपात केल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तब्बल ६५ ते ७० तास लागत असल्याने शहरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच पाण्याचे नियोजन नसतानाही एप्रिल २०१७ पासून तब्बल सहा हजार ३०० नव्या नळजोडण्या देण्यात आल्याने पाणीटंचाई जाचक ठरू लागली आहे.

मीरा- भार्इंदर शहराला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर तर एमआयडीसीकडून ९० दशलक्ष लिटर असे मिळून एकूण १७६ दशलक्ष लिटरचा पाणीपुरवठा शहराला होतो. पाणीटंचाई असताना पालिका व लोकप्रतिनिधींनी नळजोडण्या बंद केल्या. पण शहरात होणारी मोठमोठी बांधकामे मात्र पाणी नसतानाही सुरूच ठेवली. उंच इमारतींमध्ये पाणी नसताना रहिवासी राहण्यासाठी आले. पाणी नसल्याने टँकर शिवाय त्यांना पर्याय नव्हता. आधीपासून राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना नव्याने राहण्यासाठी आलेल्यांनाही पाणी मिळत नव्हते.

आघाडी सरकारने एमआयडीसीच्या ७५ दशलक्ष लिटर पाण्याची योजना मंजूर केली होती. ज्याची अमलबजावणी युती सरकारच्या काळात झाली. आधीच पाण्याची कमतरता असताना ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना सुरू होताच एप्रिल २०१७ पासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरूवात झाली. पण प्रत्यक्षात मात्र आजही जेमतेम ४० दशलक्ष लिटरच पाणी मिळते. पाण्याची उपलब्धता व नियोजन न करताच पालिकेने काहींच्या राजकीय फायद्यांसाठी वारेमाप दिलेल्या नळजोडण्यांमुळे आता पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होवू लागल्या आहेत.

सरकारच्या पाटबंधारे विभागाने धरणातील पाण्याचासाठा कमी असल्याने त्याच्या नियोजनासाठी दर आठवड्यात गुरूवारी मध्यरात्री १२ पासून ते शनिवारी सकाळी सहापर्यंत असे ३० तास पाणीकपात सुरू केली आहे. शहर टेलएण्डला असल्याने या कपातीचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. शनिवारी सकाळी पाणी सुरू झाले तरी शहरापर्यंत येण्यास सुमारे तीन तास लागतात. पाण्याचा दाबही कमी असतो. आधी २८ ते ३२ तासांनी येणारे पाणी आता कपाती नंतर तब्बल ६४ ते ७० तासांनी मिळते. सोमवारपासून तोच पाणीपुरवठा काहीसा सुरळीत होऊन ५४ तासांवर जातो. गुरूवारपर्यंत पाणी पुरवठा काहीसा सुरळीत होत नाही तोच पुन्हा मध्यरात्री पासून ३० तासांची पाणीकपात लागू केली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.पालिका व लोकप्रतिनिधीच जबाबदारपाण्याचे नियोजन नसताना बिल्डर लॉबीच्या हितासाठी बांधकामे थांबवली नाहीत. उलट दीड वर्षात तब्बल सहा हजार ३०० नवीन नळजोडण्या दिल्या. कायद्याने बंधनकारक असलेली रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. केवळ ना हरकत दाखले देवून हात ओले करण्यातच स्वारस्य आहे. टँकरने पाणी उपसा आणि पाण्याच्या गळती व चोरीकडेही कानाडोळा केला जात आहे.च्शहरात होणारी मोठमोठी बांधकामे मात्र पाणी नसतानाही सुरूच ठेवली. उंच इमारतींमध्ये पाणी नसताना रहिवासी राहण्यासाठी आले. पाणी नसल्याने टँकर शिवाय त्यांना पर्याय नव्हता.च्आधीपासून राहणाºया नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसताना नव्याने राहण्यासाठी आलेल्यांनाही पाणी मिळत नव्हते. एप्रिल २०१७ पासून नव्याने नळजोडण्या देण्यास सुरूवात झाली. पण प्रत्यक्षात मात्र आजही जेमतेम ४० दशलक्ष लिटरच पाणी मिळते.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी