शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

मीरा-भार्इंदर महासभेत क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सत्ताधारी, विरोधी पक्षात तुतू-मैमै

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 20:07 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अद्याप सुरु न झालेल्या एकमेव क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सोमवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांत तुतूमैमै पहावयास मिळाली.

भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अद्याप सुरु न झालेल्या एकमेव क्रिडा संकुलाच्या नामकरणावरुन सोमवारच्या विशेष महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांत तुतूमैमै पहावयास मिळाली. मात्र यात सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर बाजी मारुन हम सो करे कायद्याचा प्रत्यय आणून दिला.

२०१४ मध्ये लोकार्पण झालेले पालिकेचे एकमेव क्रिडा संकुल सध्या कंत्राटदारांच्या करारात अडकुन पडले असताना त्याचे नामकरण मात्र आजच्या महासभेत उरकरण्यात आले. तत्पुर्वी २०१४ मध्ये सुरुवातीला सेनेचे स्थानिक नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांनी या क्रिडा संकुलाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची मागणी पालिकेकडे पत्राद्वारे केली होती. एकमहिन्यानंतर याच क्रिडा संकुलाच्या सुधारित अंदाजपत्रकाचा ठराव स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी मांडला असता त्यात क्रिडा संकुलाला भाजपा नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. वास्तविक स्थायीत नामकरणाचा मंजुर होणारा ठराव ग्राह्य धरला जात नसल्याने त्यावर महासभेत चर्चा केली जाईल, या उद्देशाने त्या ठरावाला सेनेसह सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली. त्यावेळी त्या ठरावाचे सुचक  सेनेचेच  स्थायीतील सदस्य प्रशांत दळवी हे होते. सध्या दळवी भाजपाचे नगरसेवक आहेत. तब्बल ३ वर्षानंतर त्या क्रिडा संकुलाला स्व. गोपीनाथ मुंडे यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सोमवारच्या विशेष महासभेत सादर केला होता. त्यावर भाजपा सत्ताधाय््राांनी २०१४ मधील स्थायी समिती बैठकीत मुंडे यांच्या नावाचा ठराव मंजुर झाल्याने क्रिडा संकुलाला त्यांचेच नाव देण्याचा मुद्दा उपस्थित करुन नव्याने ठराव मांडला. त्याला सेनेसह काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवुन सेनेनेच सुरुवातीला धर्मवीर आनंद दिघे यांचेच नाव देण्याची केलेली मागणी ग्राह्य धरण्याचा ठराव मांडला. यावर सेनेचे गटनेने हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, नगरसेवक प्रवीण पाटील तर काँग्रेसचे जुबेर इनामदार, अनिल सावंत यांनी स्थायीत मंजुर झालेला नामकरणाचा ठराव अधिकृतपणे ग्राह्य धरता येत नसल्याचा दावा करीत सत्ताधाय््राांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर दोन्ही बाजुंच्या सदस्यांत जोरदार वादावादी झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी महापौर डिंपल मेहता यांनी दोन्ही बाजुंकडील सदस्यांनी मांडलेल्या ठरावावर मतदान घेण्याचे निर्देश नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांना दिले. त्यानुसार पार पडलेल्या मतदानात सत्ताधाय््राांचा ठराव ६१ मताधिक्याने मंजुर झाल्याचे महापौरांकडुन जाहिर करण्यात आले. सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार चालविला असुन यावर चर्चा झालीच पाहिजे, अशी मागणी कॉँग्रेसचे जुबेर इनामदार यांनी करुन त्यासाठी विरोधकांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलीच पाहिजे, असा दावा केला. परंतु, महापौरांनी निवडणुकीच्या माध्यमातुन सत्ताधा-यांचा ठराव बहुमताने मंजुुर झाल्याचे सांगुन उद्भवलेला गोंधळ शांत केला. 

पालिकेच्या पहिल्या विशेष महाभसेत महापौर डिंपल मेहता या अमराठी असल्याने तसेच महापौर पदावरुन सभागृह चालविण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने त्यांच्या ऐवजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनीच विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत महापौरांनाच बोलण्याची विनंती केल्याने महापौरांनी मराठी व हिंदी या दुहेरी भाषेचा वापर करुन पहिली सभा निभावुन नेली. सभागृहात भाजपा सत्ताधारी सदस्यांची संख्या ६१ इतकी असल्याने त्यांना सत्ताधाय््राांच्या बाकावर बसण्यास जागा नसल्याने त्यांनी विरोधी पक्षांतील सदस्यांच्या बाजुला ठाण मांडले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक