शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ठाण्याच्या कारागृहात ‘मी-टू’: अधीक्षकांविरुद्ध महिला कॉन्स्टेबलची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:42 IST

सध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्धही एका महिला कॉन्स्टेबलने छळवणूकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आरोपांमुळे कारागृह वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकारागृहातील दुसरा प्रकारविशाखा समितीकडून चौकशी सुरुकारागृहाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडेही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्याचे प्रभारी कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्ध कारागृहाच्या महिला कॉन्स्टेबलने मानसिक आणि शारीरिक छळवणुकीची तक्रार विशाखा समितीकडे केली आहे. कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन यांच्याकडेही या महिलेने याबाबतची तक्रार केली आहे. सध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना उच्चपदस्थ अधिका-यावर झालेल्या या आरोपांमुळे कारागृहवर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.कारागृहातून सुटलेल्या काही महिला कैद्यांबरोबर तुझे संबंध आहेत, हे कारण दाखवून तसेच ‘तुला पाहिजे तशी ड्युटी देतो’, मी सांगेल तसे कर’, असे सूचक विधान करून आपल्याशी गेल्या तीन वर्षांपासून प्रभारी अधीक्षक वायचळ यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप या कर्मचारी तरुणीने केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीचे अधीक्षक हिरालाल जाधव यांनादेखील एका महिला कर्मचा-याच्या विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी निलंबित केले होते. जाधव यांच्याविरुद्धही ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी अटकपूर्व जामीनही घेतला होता. त्यांच्या जागी कारागृहाचे उपअधीक्षक वायचळ यांच्याकडे प्रभारी अधीक्षकपदाची सूत्रे आली. परंतु, वायचळ हे गेल्या पाच वर्षांपासून एकाच ठिकाणी असून त्यांनी अनेकदा आपल्याला क्षुल्लक कारणावरूनही त्रास दिला. अगदी सॅल्यूट करताना कसा पाय ठेवला, इथपासून हवी तशी ड्युटी देतो, पण तू माझ्याबरोबर राहा, मी सांगेल तसे कर, अशा पातळीवर त्यांनी आपली छळवणूक केल्याचे गंभीर आरोप या कॉन्स्टेबल तरुणीने केले आहे. कारागृहातून सुटलेल्या कैद्यांशी तर माझेच नव्हे, तर अनेक अधिकारी आणि कर्मचाºयांचे संबंध येतात. हे आपण पुराव्यानिशी सांगू शकू. कारागृहाबाहेर आपले वैयक्तिक कोणाशी संबंध असू शकतात. पण, त्यावरून कोणी अधिकारी छळवणूक करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत, रीतसर पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही तिने सांगितले. दरम्यान, विशाखा समितीकडे या महिला कर्मचा-याची तक्रार असल्याने यासंबंधी चौकशी सुुरू आहे. या चौकशीनंतर तिने तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचे ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांनी सांगितले.

 

‘‘नातेवाइकांसमवेत बाहेरगावी जाण्यासाठी या महिला कर्मचा-याने काही दिवसांपूर्वी रजा मागितली होती. प्रत्यक्षात ती अजमेरला कारागृहातून सुटलेल्या एका महिला कैद्यासोबत तेही विमान प्रवासाने गेली होती. याचे फोटोही आपल्याकडे आले. याबाबत, तिला १ सप्टेंबर २०१८ रोजी मेमो बजावला. त्यानंतर, तिने ३ आॅक्टोबर रोजी कारागृहाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत माझ्याविरुद्ध तक्रार केली आहे. हा ‘मी-टू’चा प्रकार नसून आता पदोन्नती जवळ असल्याने मला अडकवण्याचा प्रकार आहे.’’नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग