शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएच्या शेफने ठाण्यातील दुकानातून चोरला लॅपटॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 21:01 IST

ठाण्यातील एका कॉफी शॉपमधून लॅपटॉपची चोरी करणाऱ्याच्या शोधात ठाणे पोलीस एमसीए अर्थात महाराष्टÑ क्रिकेट क्लबच्या कॅन्टीनपर्यंत पोहचले. या कॅन्टीनमधील शेफनेच हा लॅपटॉप चोरल्याचे उघड झाल्यानंतर त्याला या ५५ हजारांच्या लॅपटॉपसह नौपाडा पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीचोरीनंतर झाला होता पसारलॅपटॉपही केला हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नौपाड्यातील लॅपटॉप चोरीप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट क्लब (एसीए) मधील देवसिंग सिंग (२७, रा. उत्तराखंड) या शेफला नौपाडा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉपही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीनहातनाका येथील ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपमध्ये देवसिंग हा पूर्वी नोकरीला होता. त्याने या दुकानातील महत्त्वाच्या नोंदी असलेला ५५ हजारांचा नामांकित कंपनीचा लॅपटॉप चोरून पलायन केल्याची घटना १० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात ‘बॉम्बे बेक हाउस अ‍ॅण्ड किचन’ या कॉफी शॉपच्या मालक रंजना नंबियार (३१) यांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, सुनील राठोड आणि पोलीस कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आदींच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सिंग याची माहिती काढली. तो बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘एमसीए’च्या कॅन्टीनमध्ये शेफचे काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला २४ नोव्हेंबर रोजी रात्री या पथकाने ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्याने या चोरीची कबुली दिल्यानंतर त्याला २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अटक केल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी