शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

एमबीएमटीचा संप अद्याप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:03 IST

मीरा रोड : नाताळचा सण व सुटीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरू केलेला संप सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच आहे.

मीरा रोड : नाताळचा सण व सुटीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरू केलेला संप सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले आहेत. पर्यायी व्यवस्था न करता प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे.पालिकेत भाजपाची स्पष्ट बहुमताची सत्ता आहे. तर स्वत: आ. मेहता हेच श्रमिक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसे असताना पालिकेच्या परिवहन उपक्रमातील कंत्राटी कामगारांचा किमान वेतना नुसारचा फरक, गेल्या महिन्याचे कमी मिळालेले वेतन आदी मागण्यांवरून कर्मचाºयांनी शुक्रवारी दुपारपासून अचानक संप सुरू केला. परिवहनची तरतूदच संपल्याने कंत्राटदारास वेतनाची कमी रक्कम दिली. जेणेकरून कर्मचाºयांनाही कमी वेतन मिळाले.कर्मचाºयांनी मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या संपामुळे शहरातील हजारो नागरिक मात्र वेठीस धरले गेले आहेत. विशेषत: मुर्धा ते उत्तन - चौक व थेट गोराई तर काशिमीरा, हाटकेश, कनकिया येथील प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने रिक्षाचालक लुटत आहेत. सुटीचे दिवस असल्याने नागरिक सहकुटुंब बाहेर पडतात. शिवाय नाताळचा सण असून उत्तन - चौक - डोंगरी येथे मोठ्या संख्येने राहणाºया ख्रिस्ती बांधवांना याचा जाच सहन करावा लागत आहे. मंंगळवार काशिमीरा येथील सेंट जेरॉम चर्चमध्ये यात्रा आहे.महापौर डिंपल मेहता यांच्या दालनात मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यासोबत आयुक्त डॉ. नरेश गीते यांची बैठक झाली. त्यामध्ये परिवहन उपक्र माची आर्थिक तरतूद गेल्याच महिन्यात संपली असल्याने आवश्यक तरतुदीचे पुर्नविनीयोजन करून घेण्यासह मंगळवारी बँका सुरू होताच रक्कम देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली. पण कर्मचाºयांच्या नेतृत्वाने मात्र आडमुठेपणा कायम ठेवल्याने संप तिसºया दिवशीही सुरूच आहे.पालिका प्रशासनानेही सत्ताधाºयांच्या संपाबद्दल कमालीची गुळमुळीत भूमिका घेतली असून नागरिकांच्या सोयीसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्थाच केली नाही. प्रशासनाने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे. संपामुळे नागरिकांचे हाल होत असून उत्तन, डोंगरी, पाली, चौक आदी भागात संतापाचे वातावरण असून शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले आहेत. आ. मेहतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.>आमदार नरेंद्र मेहतांना मंगळवारी बँका उघडताच आर्थिक तरतूद करुन पैसे देतो असे सांगितले असून संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.- विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त.नाताळचा सण आहे. या आधी दिवाळीत असाच कर्मचाºयांनी अचानक संप केला होता. सत्ताधारी यांनीच असे अचानक संप करून सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे निषेधार्थ आहे. - आॅलवीस फॅरो, अध्यक्ष, प्रवासी संघटना.>सत्ता हातात असताना स्वत:च्या संघटनेतील कर्मचाºयांचे प्रश्न सोडवायचे नाहीत व त्यांचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करून घेत आहेत. भाजपा व त्यांच्या नेत्याने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणे म्हणजे मनमानीपणाचा कळस आहे. पालिकेने कर्मचाºयांना न्याय द्यावा पण कर्मचाºयांनीही नेत्यासारखा आडमुठेपणा न करता बस सुरु कराव्यात अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. - अरूण कदम, माजी उपनगराध्यक्ष.

टॅग्स :mira roadमीरा रोड