शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महाविद्यालयातील तरुण कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी महापौरांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 08:46 IST

भाजपा उमेदवाराचा भाऊ तथा महापौरांचा पती विनोद मेहतासह त्याच्या तीन साथीदारांवर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मीरा रोड - एका परिचित अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराची पत्रके वाटणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थी व एका तरुणास बळजबरी गाडीत घालून मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपा उमेदवाराचा भाऊ तथा महापौरांचा पती विनोद मेहतासह त्याच्या तीन साथीदारांवर भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आदी अदखलपात्र गुन्हा सांगत रात्रीपर्यंत टाळटाळ चालवल्याने पोलिसांच्या भूमिकेवरून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांनी त्यांच्यावर दाखल २१ गुन्हे - दावे यांची जाहीर केलेली माहिती येथील अपक्ष उमेदवाराने आपल्या प्रचार पत्रकात छापून वाटली होती. शनिवारी ५ वा. प्रचार संपणार म्हणुन काही शिल्लक पत्रके भाईंदर पूर्वेच्या साईनगर भागात ती वाटण्याचे काम त्यांचे परिचीत महाविद्यालयातील विद्यार्थी मित किशोरभाई पटेल (१९), यश प्रवीण पटेल (१९), महेश हेमंत बांदिया (१९) व शुभम किरण साळसकर (२३) हे चौघे जण करत होते.पत्रके वाटत असल्याची माहिती मिळताच चारच्या सुमारास नरेंद्र मेहता यांचा लहान भाऊ तथा महापौर डिंपल मेहता यांचा पती विनोद मेहता हा आपल्या दोन खासगी अंगरक्षकांसह गाडी घेऊन आला. तेथे त्याने व त्याच्या अंगरक्षकांनी अर्वाच्च शिवीगाळ करत या तरुणांना मारत बळजबरी आपल्या गाडीत ढकलून गाडीत डांबले व गाडी सुरू करून मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ व धमक्या दिल्या.याची माहिती अपक्ष उमेदवारासह काही सामाजिक कार्यकर्त्यांना कळताच त्यांनी नाळाराम पाटील मार्ग परिसरात शोधाशोध चालवली असता मेहताची गाडी दिसून आली. त्यानंतर मात्र मेहताने आपली गाडी थेट नवघर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांना बोलावून तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तेथे त्या तरुणांनाच आरोपी सारखी वागणूक देत खडसवायला सुरुवात केली.काही वेळातच तरुणांचे पालक, परिसरातील नागरिक पोलीस ठाण्यात आले असता पोलिसांनी मेहता विरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. हा दखलपात्र नव्हे तर अदखलपात्र गुन्हा आहे. फिर्याद द्यायची नसेल तर निघून जा, आम्ही डायरी नोंद करू असा उर्मट आणि अरेरावीपणा पोलिसांनी चालवल्याने नागरिक संतप्त झाले. लोकांनी नरेंद्र मेहतांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.वरिष्ठांपर्यंत तक्रारी आणि सोशल मीडियावर पोलिसांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त होऊ लागला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक पोलीस ठाण्यात जमले. सामान्य घरातील मुलांना मारहाण करून दहशत माजवणाऱ्या मेहता आणि त्यांच्या गुंड टोळीचे पोलीस बटिक बनले असून, त्यांनी वर्दी गहाण ठेवल्याची बोचरी टीका सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सामंत, सरिता नाईक, कृष्णा गुप्ता, गोवर्धन देशमुख, रोहित सुवर्णा आदींनी केली. अखेर रात्री पोलिसांनी विनोद मेहतासह त्याचे दोन खासगी अंगरक्षक व वाहन चालक अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. मेहतावर आधीचे देखील गुन्हे दाखल असुन त्याला अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर