शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 07:13 IST

उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.

उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे. आधीच आमदारकी मिळविलेल्या कलानी कुटुंबाने आता महापौरपदही काबीज करून उल्हासनगरातील आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे.उल्हासनगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. भाजपा-ओमी टीमची सत्ता घालविण्यासाठी साई पक्षातील फुटीर गटाच्या उमेदवार ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र, शिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपाचे नगरसेवक भाजपासोबत गेले. फुटीर गटातील शेरी लुंड आणि कांचन लुंड यांनीही ऐनवेळी भाजपाची वाट धरल्याने शिवसेनेची कोंडी झाली. त्यामुळे फुटीर गटातील नगरसेवकांनी निवडणुकीतून माघार घेत स्वगृही जाणे पसंत केले.एकूणच परिस्थिती विचारात घेऊन शिवसेनासमर्थक आणि साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी महापौरपदाचा अर्ज मागे घेतला. भाजपाच्या डमी उमेदवार डिम्पल ठाकूर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पंचम कलानी यांची बिनविरोध निवड जाहीर केली गेली.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीचे पीठासीन अधिकारी राजेश नार्वेकर यांनी महापौरपदी पंचम कलानी यांचे नाव घोषित करताच कलानी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. हा विजय अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMayorमहापौर