शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बीएसयूपी योजनेला निधी आणल्याची आमदार सरनाईक आणि शिवसेनेची बॅनरबाजी फसवी असल्याचा महापौरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 18:07 IST

आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेची बॅनरबाजी लोकांची फसवणूक करणारी असल्याचा घणाघात करत ठेकेदारदेखील शिवसेनेचा असल्याचा आरोप केला. 

मीरा रोड - शिवसेनेच्या वतीने काशिमीरा परिसरात शिवसेनेने बॅनरबाजी करत बीएसयूपी योजनेसाठी १२७ कोटींचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केल्याचे म्हटल्याने महापौर ज्योत्स्ना हसनाळे ह्यांनी आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेची बॅनरबाजी लोकांची फसवणूक करणारी असल्याचा घणाघात करत ठेकेदारदेखील शिवसेनेचा असल्याचा आरोप केला. 

मीरा-भाईंदर महापालिकेच्या रखडलेल्या बीएसयूपी योजनेला आडकाठी ठरणारा सत्ताधारी भाजपाचा स्थायी समितीचा ठराव शासनाने रद्द केल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक ह्यांनी पाठपुरावा करून बीएसयूपीच्या ३ इमारती बांधण्याच्या कामाचे कार्यादेश काढायला लावले. सदर योजना गेल्या १० वर्षांपासून रखडली असून, भाजपाच्या मोदी सरकारने सदर योजनाच बंद केल्याने पालिकेला अनुदान मिळणार नाही आहे. त्यामुळे सदर योजनेसाठी १५० कोटींचे कर्ज एमएमआरडीएकडे पालिकेने मागितले आहे. 

सदर योजना महापौर आणि भाजपाच्या अन्य ३ नगरसेवकांच्या प्रभागात असल्याने शिवसेनेचे फलक लागल्यावरून राजकारण तापले आहे. महापौरांनी याबाबत तातडीची पत्रकार परिषद घेऊन सदर लागलेले फलक हे बेकायदेशीर असल्याने त्वरित काढण्याचे आदेश दिल्याचे त्या म्हणाल्या. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बीएसयूपी योजना रखडली असून, वेळेत योजना पूर्ण केली असती तर अनुदान गमवावे लागले नसते. आता कर्ज घेण्याची पाळी आली नसती . घरे पाडण्यात आल्या नंतर येथील झोपडीधारक नरकयातना  भोगत गेली १० वर्षे राहात असून यात राजकारण कोणी करू नये. मग ते शिवसेनेचे नेते असो की आमच्या पक्षाचे नेते, असे त्यांनी बजावले. 

शिवसेनेने फलकावर १२७ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतल्याचे तद्दन खोटे आणि नागरिकांची दिशाभूल करणारे लिहिले आहे. असा कोणताच निधी मंजूर झालेला नसून एमएमआरडीएकडून १५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील ४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. त्यामुळे आ. सरनाईक आणि शिवसेनेने बीएसयूपी योजनेत असले खोटारडेपणाचे राजकारण करू नये, असा इशारा महापौरांनी दिला. बांधकाम करणारा ठेकेदार शिवसेनेचा असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी भाजपाचे नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भोसले ह्यांनी देखील टीकेची झोड उठवत फसव्या राजकारणाचा निषेध करत असल्याचे म्हटले.