शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

भिवंडीत केमिकल गोदामांना भीषण आग; १२ गोदाम जळून खाक, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

By नितीन पंडित | Updated: June 14, 2025 19:12 IST

घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या. 

नितीन पंडितभिवंडी: अंजुर फाटा दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत सायंकाळी केमिकल साठवलेला गोदामात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत एकूण बारा गोदाम जळून खाक झाले असून अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदामा संकुलातील आठ गोदामात मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सुरुवातीला आग लागली. गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्या ने वाढत गेल्याने पाहता पाहता आगीच्या भक्षस्थानी १२ गोदाम जळून खाक झाली आहेत. गोदामात मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील केमिकल असल्याने या संपूर्ण परिसरात उग्र वास व धूर पसरत राहिल्याने नागरिकांना डोळे चूरचूरणे व श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.

घटनास्थळी दाखल झालेल्या भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले मात्र वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशामक दलाच्या गाड्या सुद्धा पाचारण करण्यात आल्या.  अंजूरफाटा ते दापोडा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचण निर्माण होत होती. नारपोली पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी येथील गर्दी नियंत्रणात आणली. या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पण ही आग आटोक्यात येण्यास अजून किती वेळ लागणार हे सांगता येणार नाही अशी माहिती अग्निशामक जवान विजय जाधव यांनी दिली आहे.

टॅग्स :fireआग