शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्मृतीदिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 22:05 IST

ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना पोलीस दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

ठळक मुद्देशहीद पोलीस कुटूंबीयांची उपस्थितीमहाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे:भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी, कर्तव्याची आणि ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या वतीने महाराष्ट्रातील २२ शहीदांसह देशभरातील २९२ हुताम्यांना पोलीस दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्र निष्ठेची जाणीव व्हावी यासाठी २१ आॅक्टोबर १९५९ पासून हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो. ठाण्यात यानिमित्त सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह मुख्यालयाच्या कर्मचा-यांनी देशभरातील शहीद पोलिसांना मानवंदना देऊन श्रद्धांजली वाहिली.लडाख येथील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस जवान २१ आॅक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी जशास तसे उत्तर दिले आणि अखेरच्या क्षणांपर्यत झुंज दिली. या हल्ल्यात दहा जवान शहीद झाले. याच घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. सोमवारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्व. चिंतामण दिघे उद्यानातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून पोलीस आयुक्त फणसळकर यांनी सकाळी ८ वाजता श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रातील २२ शहीद हुताम्यांसह देशभरात शहीद झालेल्या २९२ हुताम्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्यासह शहीद पोलीस हवालदार भालचंद्र कर्डिले, शहीद पोलीस नाईक तुकाराम कदम, शहीद पोलीस हवालदार रमेश जगताप आणि शहीद पोलीस नाईक बाळू गांगुर्डे यांचे कुटूंबीय तसेच पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसpolice parade groundपोलिस कवायत मैदान