शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या अमिषाने अपहरण, अवघ्या 15 दिवसात छडा : मुलीची मध्यप्रदेशातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 22:04 IST

लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे.

जितेंद्र कालेकरठाणे : लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला वर्तकनगर पोलिसांनी रविवारी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याच्या तावडीतून या मुलीचीही सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्याच्या सावरकरनगर भागात राहणारी ही १७ वर्षीय मुलगी १६ सप्टेंबर २०१७ पासून अचानक बेपत्ता झाली. जाण्यापूर्वी तिने मैत्रिणीच्या घरी कोणी नसल्याने आपण तिच्याकडे जात असल्याचे कारण सांगितले होते. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गेलेल्या या मुलीची दुसºया दिवशी कुटूंबियांनी वाट पाहिली. ती न आल्यामुळे तिची सर्वत्र शोधाशोध केली. कुठेही न आढळल्यामुळे अखेर तिच्या पालकांनी १७ सप्टेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर, निरीक्षक रविदत्त सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन आंब्रे यांच्या पथकाने तिचा शोध सुरु केला. चौकशीत तिच्याच एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून तिला सावरकरनगर भागात राहणाºया सिसोदिया (मुळ रा. कंचनपूर, ता. चंदला, जिल्हा छत्रपूर, मध्यप्रदेश) याने पळवून नेल्याची माहिती समोर आली. यातून तांत्रिक तपासाच्या आधारे, खबºयांच्या मदतीने तसेच मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांच्या आदेशाने जमादार आर. के. दाभाडे यांचे पथक मध्यप्रदेशात पाठविण्यात आले. या पथकाने सिसोदियाची धरपकड केली असून त्याच्या तावडीतून पिडीत मुलीची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोमवारी ठाण्यात आणणारशनिवारी विजयादशमीच्या दिवशी वर्तकनगर पोलिसांचे पथक मध्यप्रदेशात गेल्यानंतर त्यांनी चंदला पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार यादव यांची या अपहरणाचा तपास करण्यासाठी मदत घेतली. दसºयाच्या दिवशी या भागात मोठी गर्दी असते, त्यामुळे कारवाईला पोषक वातावरण नसते, असे यादव यांनी सांगितले. रविवारी मात्र, सिसोदियाच्या घरी धाड टाकून पोलिसांनी त्याला पकडले. ही मुलगी अल्पवयीन असूनही त्याने तिच्याशी लग्न केल्याचा दावा केला आहे. आता या सर्वच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला सोमवारी ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण