उल्हासनगरात २३३ अंध जोडप्यांचा विवाह

By admin | Published: March 28, 2017 05:55 AM2017-03-28T05:55:12+5:302017-03-28T05:55:12+5:30

शेकडो अंध, अपंग, निराधारांचे पालकत्व स्वीकारलेल्या अंध हितकारी संस्थेने आतापर्यंत २३३ अंध जोडप्यांची मोफत

Marriage of 233 blind couples in Ulhasnagar | उल्हासनगरात २३३ अंध जोडप्यांचा विवाह

उल्हासनगरात २३३ अंध जोडप्यांचा विवाह

Next


सदानंद नाईक / उल्हासनगर
शेकडो अंध, अपंग, निराधारांचे पालकत्व स्वीकारलेल्या अंध हितकारी संस्थेने आतापर्यंत २३३ अंध जोडप्यांची मोफत लगं्न लावून त्यांना संसारात बसवले आहे. तसेच त्यांच्या हाताला रोजगार मिळावा, म्हणून विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.
उल्हासनगरातील जगदीश व सुशीला पटेल या दाम्पत्याने घरावर तुळशीपत्र ठेवून अंध, अपंग, वृद्ध, निराधार व विधवांच्या जीवनात आनंद फुलवण्याकरिता वाहून घेतले. त्यांनी ‘अंध हितकारी संस्थे’ची १९७८ साली स्थापना केली. रेल्वे व इतर ठिकाणी भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र पटेल दाम्पत्याने अंधांना देऊन त्यांच्यात जिद्द निर्माण केली. पटेल दाम्पत्याने अंध, अपंग, वृद्ध, निराधार, विधवा महिला यांना देणगीदारांच्या मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. शहरासह राज्यातील विविध भागांतील अंधांची नोंदणी सुरू केली असून संस्थेकडे ७५० पेक्षा जास्त अंधांची नोंदणी झाली. गुरुवार व शनिवार या आठवड्यातील दोन दिवस अपंगांसाठी विशेष भंडाऱ्याचे आयोजन करून त्यांना गोडधोड खाऊ घातले.
जगदीश व सुशीला पटेल यांनी अंधांना एकत्र आणून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना
मिळवून दिला. खुर्चीचे विणकाम, राख्या बनवणे, दिवाळीसाठी दिवे व तोरण बनवणे, मेणबत्ती बनवणे
आदी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण
देऊन हाताला काम मिळवून दिले. वर्षातून एकदा चादर, ब्लँकेट, छत्र्यांचे वाटप व चालण्यासाठी लाकडी काठी आदी साहित्याचे मोफत वाटप केले जाते. अंध जोडप्यांची मोफत लग्नं लावून देत असून संसारोपयोगी भांड्यांसह तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या पायल दिल्या जातात. तसेच लिहिण्या वाचण्यासाठी ब्रेल लिपी शिकवली जाते. त्यांच्यासाठी विशेष वाचनालय पटेल दाम्पत्याने सुरू केले आहे. अंधांमधील कलागुण हेरून गायक, तबलावादक अशा कलांना प्रोत्साहन देत आॅर्केस्ट्रा पथक स्थापन केले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्या आॅर्केस्ट्राचे शो होतात. संस्थेने त्यांच्या हाताला काम मिळाले, नाहीतर त्यांची उपासमार होऊ नये, म्हणून १०० गरीब व गरजूंना दर आठवड्याला बोलवून अन्नधान्याचे मोफत वाटप केले जाते.

Web Title: Marriage of 233 blind couples in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.