भार्इंदर : अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या पालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्यालय बाजाराच्या नावाखाली हटविण्याचा कुटील डाव प्रशासन काही राजकीय मंडळींच्या दबावाखाली साधत असून संतापलेल्या शिवसेनेने डाव हाणून पाडण्याची तयारी सुरु केली आहे.नगरपालिके पासून ६० फुट मार्गावर एकमेव अग्निशमन केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे मुख्यालय शहराच्या केंद्रस्थानी असल्याने तेथून घटनास्थळी वेळेत पोहोचता येणे शक्य असल्याचे अग्निशमन दल सूत्रांनी सांगितले. असे असूनही अत्यावश्यक सेवेतील संवेदनशील ठरलेल्या या ठिकाणी प्रशासनाने रात्र निवारा सुरु केला होता. त्याचा गैरफायदा काही समाजकंटकांकडून होऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर तो बंद करण्यात आला आहे. त्यानंतर हे मुख्यालयच हटविण्याचे कटकारस्थान पालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या सुपिक डोक्यात आले असून त्याला काही स्वार्थी राजकारण्यांकडून पाठबळ मिळू लागले आहे. हे मुख्यालय हटवून तेथे बाजार थाटण्याचा कुटील डाव सध्या रचला जाऊ लागला आहे. यामागे, मुख्यालयातून निर्गमित होणाऱ्या गाड्या सरळ बाहेर पडत नसल्याने ते सोईचे नसल्याचे हास्यास्पद कारण १८ वर्षांनंतर पुढे केले जात आहे. अद्याप बाजार थाटण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सभागृहापुढे सादर केला नसला तरी त्याच अधिकाय््राामार्फत नियोजित बाजाराच्या आर्थिक व प्रशासकीय प्रस्तावाला मात्र सभागृहाने मान्यता दिल्याने बाजाराचा मार्ग सुकर झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे मुख्यालय लवकरच उड्डाणपुलाजवळ नव्याने बांधलेल्या एकमजली केंद्रात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, या ठिकाणी आवश्यक सुविधाच उपलब्ध नसल्यासह ते सोईचे नसल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले.
अग्निशमन मुख्यालयात बाजार थाटण्याचा डाव
By admin | Updated: October 5, 2015 00:50 IST