शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ठाण्याच्या नौपाडयातील मराठी- गुजराथी वाद: विकासकाला ‘मनसे स्टाईल’ने दिली समज

By जितेंद्र कालेकर | Updated: September 16, 2019 23:13 IST

ठाण्याच्या नौपाडयातील विष्णुनगर भागातील एका मराठी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियातून व्हायरल झाल्याचे मनसे आणि काँग्रेसनेही दखल घेतली. संबंधित मारहाण करणाऱ्या विकासकाला गाठून आपल्या स्टाईलने मनसेने त्याला समज देत मराठीतून माफी मागण्यास भाग पाडले. तर काँग्रेसनेही याप्रकरणी निषेध व्यक्त करीत खूनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देकान धरुन मागितली मराठीतून माफीकाँग्रेसनेही व्यक्त केला निषेधअखेर पाच दिवसांनी झाला गुन्हा दाखल

ठाणे: नौपाडयाच्या विष्णुनगर भागातील रहिवाशी राहूल पैठणकर यांना जबर मारहाण केल्याचा व्हीडिओ रविवारी प्रचंड व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. शिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी त्यांना मनसे स्टाईलने समज दिली. त्यानंतर शहा यांनी या कृत्याबद्दल कान धरुन माफी मागितल्याचाही व्हीडिओ सोमवारी व्हायरल करण्यात आला.पैठणकर आणि शहा वास्तव्यास असलेल्या विष्णुनगर येथील ‘सुयश’ सोसायटीत इमारतीची लिफ्ट पाचव्या मजल्यावरुन सहाव्या मजल्यावर येण्यास विलंब झाल्याने ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा वाद उद्भवला होता. याच वादातून पैठकणर यांना शहा पिता पुत्रांनी बेदम मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्याचवेळी ‘मराठी - घाटी तुला नौपाडयात रहायची लायकी नाही’ असे आक्षेपार्ह उद्गारही काढले होते. याचीच गंभीर दखल घेत मनसेच्या अविनाश जाधव यांनी शहा याला जाहीर माफी मागायला भाग पाडू असे आव्हान दिले होते. त्यानुसार सोमवारी त्याला मुंबईत गाठून मनसे स्टाईलने ‘समज’ दिली. त्यानंतर शहा यांनी कान धरुन माफी मागितली. मराठी माणसाच्या नादाला लागणार नाही. लागलो तर महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये जाईल, असेही त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले. आपण राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कॅमे-यासमोर शिवीही देणार नाही आणि कोणाला मारहाण करणार नसल्याचे सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जाधव यांनी म्हटले आहे. दरम्यान, या संदर्भात जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.*कॉग्रेसनेही केला निषेधदरम्यान, शहा यांनी मराठी माणसाची लायकी काढून अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल तसेच क्षुल्लक कारणावरुन राहुल पैठणकर यांना केलेल्या अमानुष मारहाणीबद्दल समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तीचा ठाणे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी विविध पदाधिकाऱ्यांसह जाहीर निषेध केला.शहा हा विकासक मराठी माणसांच्या जीवावर मोठा झालेला आहे आणि अशाप्रकारे केलेले वक्तव्य कधीही मराठी माणसांकडून खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा गुजराती समाजही कधीच समर्थन करणार नाही. त्यामुळेच ठाण्यातील नौपाडा भागात हसमुख शहा हे विकास करीत असलेल्या एका बांधकाम साइटवर बॅनर लावून काँग्रेसने निषेध नोंदविल्याचे पिंगळे यांनी म्हटले आहे. मारहाणीच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी याप्रसंगी करण्यात आली. प्रदेश ओबीसी विभाग सरचिटणीस कृष्णा भुजबळ, श्रीकांत गाडीलकर, जे पी गुड्डू ,संदीप यादव आणि सागर लबडे आदी यावेळी उपस्थित होते...........................व्हायरल व्हिडिओची दखल:गुन्हा दाखलकिरकोळ कारणावरून नौपाडयातील विष्णुनगर भागातील दोन कुटूंबामध्ये वाद उफाळून आल्याने दोघांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी राहूल पैठणकर आणि हसमुख शहा या दोघांनी एकमेकांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. याच संदर्भातील व्हायरल झालेल्या व्हीडिओची दखल घेत सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये पैठणकर यांना बेदम मारहाण केली जात असल्याचे तसेच त्यांचा रस्ता अडविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी १६ सप्टेंबर रोजी रस्ता अडविणे, शिवीगाळ, मारहाण केल्याच्या कलम ३४१ तसेच ३२३, ५०६ आणि ५०४ ,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पैठणकर हे ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वडीलांना ठाणे रेल्वे स्थानक येथे सोडविण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांना जाण्यासाठी अटकाव करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केली. यात त्यांच्या उजव्या आणि डाव्या हाताला, डोक्याला तसेच डाव्या डोळयाच्या खाली मार लागला. कहर म्हणजे ‘तुझे बादमे देख लेता हू,’ अशीही धमकी दिल्याचे पैठणकर यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliceपोलिस