शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale : केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, तरी राहावं लागणार तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 16:18 IST

Ketaki Chitale : ठाणे सत्र न्यायालयानं केतकीला जामीन केला मंजूर

Ketaki Chitale : वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ठाणे सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. नवी मुंबई येथील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला.

यापूर्वी ठाणे सत्र न्यायालयात केतकीच्या वकिलांनी तिला जामीन मिळावा यासाठी युक्तीवाद केला होता. या प्रकरणी युक्तीवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयानं पुढील सुनावणीसाठी १६ जून ही तारीख दिली होती. दरम्यान, न्यायालयानं आज तिला २५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

यापूर्वी झालेल्या युक्तीवादादरम्यान केतकीचे वकिल योगेश देशपांडे यांनी या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्यात लावण्यात आलेले कलम योग्य नसल्याचा युक्तीवाद केला होता. तर केतकीच्या अ‍ॅट्रोसिटी जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात झालेल्या युक्तीवादादरम्यान सरकारी वकील अमित कटारणवरे यांनी आपली बाजू मांडली होती. केतकीला या प्रकरणी जामीन मिळाला असला तरी तिला अद्यापही तुरूंगातच राहावं लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरी आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुढील सुनावणी २१ जून रोजी होणार आहे.तर दुसरीकडे केतकी चितळेच्या अटकेप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानंही दखल घेतली आहे. महिला आयोगानं महाराष्ट्राच्या डीजीपींना नोटीस पाठवली आहे. तसंच त्यावर सात दिवसांमध्ये स्पष्टीकरणही मागितलं आहे.

अटक बेकायदेशीरतर दुसरीकडे आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत केतकी चितळेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केतकीला १५ मे रोजी शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेCourtन्यायालयthaneठाणे