शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
3
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
4
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
5
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
6
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
7
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
8
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
9
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
10
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
11
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
12
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
13
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
14
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
15
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
16
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
17
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
18
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
19
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
20
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल

मराठा आरक्षण आंदोलन : अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगरमध्ये बंद शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:20 AM

रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट ; सुरक्षेसाठी शाळांना दिली सुटी

भिवंडी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळपासून शहरातील कोटरगेट, आनंद दिघे चौकात महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले. या आंदोलनात शिवसेना व भाजपाचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. दरम्यान, भाजपा आमदार महेश चौघुले यांनी आंदोलकांची भेट घेऊन मराठा समाजाला पाठिंबा दर्शवत न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन करणार असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. आंदोलन सकल मराठा समाजाचे शहर अध्यक्ष साईनाथ पवार, कार्याध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर व तहसीलदार शशिकांत गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी अशोक फडतरे, सत्वशीला जाधव, प्रवीण पाटील, भरत सकपाळ, सयाजी मोरे, नगरसेवक अरु ण राऊत, मारूती देशमुख आदी सहभागी झाले होते.उल्हासनगरमध्ये काढली रॅलीउल्हासनगर : शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सेंच्युरी कंपनीसमोरील मुरबाड रस्त्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. शहरात रॅलीही काढण्यात आली. व्यापारी, रिक्षा संघटना, रिपाइंने बंदला पाठिंबा दिला होता. दिलीप गायकवाड यांच्या नेतृत्वााखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले.मुख्य मार्केटमध्ये बंदमुळे शुकशुकाट होता. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव हेही ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक शाळांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शेखर यादव, राजा पाटील यांनीही पाठिंबा दिला. फर्निचर, जपानी, इलेक्ट्रॉनिक, जीन्स, बॅग मार्केट परिसरात बंद पाळला.मीरा- भार्इंदरमध्ये तुरळक प्रतिसादमीरा रोड : बंदला मीरा- भार्इंदरमध्ये तुरळक प्रतिसाद मिळाला. भार्इंदर उड्डाण पुलावर टायर जाळण्याचा प्रकार घडला. सरकार विरोधात घोषणा दिल्या. सकाळ पासून शहरातील बहुतांश वाहतूक सुरळीत होती. दुकाने सुरू होती. मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या रामदेव पार्क, पेणकर पाडा, सृष्टी , गोडदेव, नवघर, इंद्रलोक भागात बंदचे वातावरण होते. सकाळपासूनच मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात फिरून बंदचे आवाहन करत होते. शहरातील रिक्षा बंद होत्या. आंदोलकांनी भाजपाचे कार्यालयही बंद केले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली.किन्हवलीत शुकशुकाट  किन्हवली येथे मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारी रॅली काढण्यात आली.जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी किन्हवली, शिवाजीनगर, नडगाव, सोगाव, लवले, ठुणे, उंभरई आदी गावातून मराठाबांधव आले होते. बाजारपेठ पूर्ण बंद होती.खर्डीत दुपारनंतर बंद : बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत दुपारनंतर दुकाने बंद ठेवली. यावेळी खर्डी बाजार पेठ, स्टेशन बाजार पेठ, खर्डी नाका येथील दुकाने बंद होती. चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अंबरनाथमध्ये कारखाने बंदअंबरनाथ :बंदला व्यापारी आणि रिक्षाचालकांनी साथ दिल्याने अंबरनाथमधील बंद यशस्वी झाला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व्यापारी संघटनेने दुकाने बंद ठेवली होती.शहरातील सर्व शाळांनी सुरक्षेच्यादृष्टीकोनातून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालय, कारखानेही बंद होते. एक हजाराहून अधिक कारखाने बंद राहिल्याने प्रचंड नुकसान झाले.शहरातील सर्व रस्ते ओस पडले होते. संघटनेच्या पदाधिकाºयांनी सकाळी शिवाजी चौकात एकत्रित येऊन बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले. बंदचा परिणाम सरकारी कार्यालयातही जाणवला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाthaneठाणेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली