शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण : सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा निर्णय, मराठा समाजाने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 02:01 IST

मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवताच मराठा समाजातील तरुणतरुणींनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला.

ठाणे : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये अनुक्रमे १२ व १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा विधिमंडळाने मंजूर केलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवताच ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मराठा समाजातील तरुणतरुणींनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना कार्यकर्त्यांनी वंदन केले. आजचा निकाल ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याची घटना असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत एकमेकांना लाडू भरवले. त्यानंतर, हातातील भगवा ध्वज आसमंतात उंच धरून नाचवत कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.या निर्णयामुळे मराठा समाजातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली होतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. हे सर्वस्वी आरक्षणाच्या मागणीकरिता निघालेल्या मराठा मोर्चाचे यश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. सकल मराठा समाजाचे दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, सूर्यराव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.मराठा समाजाला मिळणाºया आरक्षणाचा लाभ धनदांडग्यांनी न लाटता तो खरोखरच समाजातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. सरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाचा बॅकलॉग लागलीच भरण्याची मागणी तरुणतरुणींनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्ता चव्हाण यांनी आता आरक्षण मिळाले आहे. ते भविष्यात टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच कोपर्डीतील त्या भगिनीला न्यायही मिळाला पाहिजे. शेतकºयांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.ठाण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गतवर्षी विशाल मोर्चा काढण्यात आला होता.ठाण्यात उत्साहठाणे : सकल मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ढोलताशा वाजवून नाचून जल्लोष केला. यावेळी लाडूंचे वाटप करून एकमेकांचे तोंड गोड केले. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, सूर्यराव आदी उपस्थित होते.मराठा आरक्षण न्यायालयात वैध ठरणार किंवा कसे याबाबत ठाण्यातील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून प्रचंड उत्सुकता होती. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर यावर चर्चा सुरु होती. दुपारी अनुकूल निकाल लागल्यावर सोशल मीडियावर शुभेच्छा तसेच एकमेकांचे अभिनंदन करण्याचे संदेश पसरले. 

टॅग्स :thaneठाणेMaratha Reservationमराठा आरक्षण