शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

एकाच दगडात मारले अनेक पक्षी; गणेश नाईक यांची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 05:02 IST

गणेश नाईक यांची खेळी : हुसेन यांचा मार्ग मोकळा, मेंडोन्सा, जैन चर्चेलाही पूर्णविराम

मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांचा मार्ग मोकळा करत, आनंद परांजपे यांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर टाकली आहे. दुसरीकडे, कट्टर विरोधक माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या परतीच्या चर्चेची वाट बंद करत, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन राष्ट्रवादीतून लढणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम देऊन नाईकांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी नव्याने अस्तित्वात आलेला मीरा-भार्इंदर मतदारसंघ मिळावा, म्हणून हुसेन यांनी जोरदार प्रयत्न केले होते; पण मेंडोन्सा यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला खेचून भाजपाच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला; पण मोदीलाटेत मेंडोन्सांना पराभूत करून मेहता ९० हजार मते घेऊन आमदार झाले. काँग्रेसचे उमेदवार याकूब कुरेशी यांना २० हजार मतेसुद्धा मिळवता आली नव्हती.

आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीआधी स्वत: मेंडोन्सांसह राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्ष सोडून भाजपा, शिवसेना व काँग्रेसमध्ये गेले. शहरात राष्ट्रवादीचे अस्तित्वच उरले नाही. या अहंपणात पालिका निवडणुकीत काँगे्रसने राष्ट्रवादीचा आघाडीचा प्रस्ताव झिडकारून टाकला. याशिवाय, राष्ट्रवादीचे उमेदवारही पळवले.

शहरात राष्ट्रवादी नावाला उरली असल्याने हुसेन यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली. लोकांच्या भेटीगाठी घेऊन जनसंपर्काचा सपाटाचालवला आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेला मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, म्हणून त्यांनी वरच्या पातळीवर मोर्चेबांधणी चालवली होती. दरम्यानच्या काळात भाजपाच्या माजी महापौर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत त्या मेहतांना पर्याय म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. मेहता व जैन यांच्यात टोकाचा वाद सुरू असला, तरी मेहता यांचे थेट मुख्यमंत्र्यांपासून पक्षाचे अनेक मंत्री व नेत्यांशी जवळचे संबंध असल्याने जैन यांना भाजपाची उमेदवारी मिळणार नाही, असे निश्चित मानले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करून जैन उमेदवारी मिळवतील, अशी चर्चा भाजपाच्याच गोटातून पुढे आली.

शिवसेनेत गेलेले मेंडोन्सासुद्धा विधानसभा निवडणूक लढवून त्यांनीच मोठे केलेल्या मेहतांचे हिशेब चुकते करण्याच्या तयारीत आहेत; पण भाजपा-सेनेची युती झाल्याने विधानसभेत सेनेला ही जागा मिळणार नसल्याचे निश्चित मानले जाते. त्यामुळे मेंडोन्साही राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवतील, अशी चर्चा सुरू होती. मेंडोन्सा व जैन यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरून हुसेन यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार का, मेहतांच्या विरोधात हे तिघेही नेते एकत्र येतील का, असे सवाल केले जात होते. दुसरीकडे हुसेन यांनी निवडणुकीच्या काळात विधानसभेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मोर्चेबांधणी चालवली होती.विधानसभा निवडणुकीत पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांचे कापले दोरच्लोकसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदर शहरामध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला सोबत घेण्यशिवाय कोणताच पर्याय नाही. त्यातच गणेश नाईक कुटुंबीय व मेंडोन्सा यांच्यातील वाद नवीन नाही.च्त्यामुळे मेंडोन्सा विधानसभेसाठी परत राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आघाडीच्या पत्रकार परिषदेत नाईक यांनी मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला दिल्याचे जाहीर करून टाकले. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्यांना पक्षात घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.च्नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षात उमेदवारीसाठी येऊ इच्छिणाऱ्यांचे दोर कापून टाकत आपले राजकीय हिशेब चुकते केल्याचे सूत्रांनी सांगितले. हुसेन यांना आघाडीची धुरा सोपवतानाच लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेची मोर्चेबांधणी चालवली असल्याचे यावरून स्पष्ट होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकGanesh Naikगणेश नाईक