शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी; ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 09:22 IST

मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी असतात. पण याला पुरावा नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मराठीमध्ये लिहिलेली बरीच आत्मचरित्रे खोटी असतात. पण याला पुरावा नाही, असे वक्तव्य ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. माजी मुख्याध्यापक अरुण जोशी यांनी लिहिलेले त्यांचे शैक्षणिक आत्मकथन ‘घडताना, घडविताना’ तसेच शिक्षिका आशा जोशी यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनपर व ललित लेख यांचा समावेश असलेले ‘जे पाहिलं ते, जे वाटलं ते’ या दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवारी श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर येथे बागवे यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, माजी शिक्षणाधिकारी एल्. पी. माळी, माजी सहसंचालक अरुण ठाकरे, वर्तकनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे आदी उपस्थित होते. शिक्षक निवृत्त झाला तरी त्याला प्रवृत्त करणारे शिष्य असतात हे नमूद करताना बागवे यांनी त्यांनी ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय सांगितला. 

ते पुढे म्हणाले,  मला शिक्षकांच्या कार्यक्रमाला जायला आनंद होतो तिथे लबाडी नसते. महाविद्यालयीन प्राध्यापकांपेक्षा मला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक जास्त आवडतात, या शिक्षकांकडे मातीचे गोळी आलेले असतात आणि त्याला आकार देण्याचे काम ते करतात. 

‘भटकंती ही मनातल्या मनात असते’जो विद्यार्थ्यांच्या मनाच्या शेतीची मशागत करतो तो शिक्षक असतो. विद्यार्थी कुठेही भेटला तरी तो शिक्षकाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही आणि हे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले संस्कार आहेत. पर्यटन हे आखून रेखून केले जाते. भटकंती ही मनातल्या मनात असते. पहिले पुस्तक हे त्या लेखकाचे अपत्य असते. शिक्षकाला कोणत्याही पद्धतीने अक्षर प्रवास थांबवू शकत नाही, असे त्यांनी शेवटी नमूद केले.

टॅग्स :thaneठाणे