शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई एटीएसला ठाणे न्यायालयाचा झटका

By जितेंद्र कालेकर | Updated: March 24, 2021 21:14 IST

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्दे हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे दिले आदेश विनायक शिंदे आणि नरेश गोरचाही ताबा आता एनआयने घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणेन्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोन्ही आरोपींचाही ताबा एनआयएकडे देण्याचेही आदेश दिले.मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा असे आदेश केंद्र सरकारने २० मार्च २०२१ रोजी महाराष्टÑ एटीएसला दिले होते. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याचे कारण दाखवत एटीएसने हा तपास एनआयएकडे सोपविला नव्हता. त्यामुळेच २४ मार्च रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अनिल सिंग आणि अ‍ॅड. संदेश पाटील यांनी एनआयएची ही सर्व बाजू ठाणे न्यायालयात मांडली. एटीएसने हा मनसुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवावा. तो एनआयए अ‍ॅक्टच्या सेक्शन ६ आणि ८ नुसार एनआयएकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयात केली होती. सेक्शन ९ नुसार राज्य सरकार अर्थात एटीएस यामध्ये केवळ सहाय्य करु शकते, असाही युक्तिवाद करण्यात आला. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्या. इंगळे यांनी मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एटीएसने थांबवून तो सर्व कागदपत्रांसह एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयए कडे सोपवावा, असेही आदेश दिले. एटीएसची बाजू अ‍ॅड. अनिता सुपारे यांनी मांडली. यावेळी एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम कलाटे, एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे आदी उपस्थित होते.* विक्रोळी येथून मनसुख हिरेन यांची मोटार चोरीचा गुन्हा, अंटालिया येथे मनसुख यांच्या मोटारीमध्ये मिळालेले जिलेटीन आणि मनसुख यांची हत्या अशा तीन गुन्हयांपैकी मोटार चोरीचा गुन्हा संपला. अंटालियाजवळ जिलेटीनची मोटार मिळाल्याचा तपास एनआयएकडे होता. याच गुन्हयाशी संलग्न असलेल्या मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळाल्याने हाही तपास एनआयएकडे मिळावा, अशी मागणी एनआयएने न्यायालयात केली होती.दरम्यान, शिंदे आणि गोर या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना तसेच या गुन्हयाची कागदपत्रे एनआयएकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोनच दिवसांपूर्वी एटीएसने सचिन वाझे यांचा मनसुख हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असून त्यांचा ताबा एनआयएकडून घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वीच न्यायालयाने या तपासासह आरोपींनाही न्यायालयामार्फत आपल्या ताब्यात घेतल्याने एटीएसला ही मोठी चपराक असल्याचे बोलले जाते. 

‘केंद्र सरकारने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. परंतू, एटीएसने तो वर्ग केला नव्हता. अखेर मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेली स्फोटकांची मोटार आणि हिरेन खून प्रकरण एकमेकांशी निगडीत असल्याने या तपासाची मागणी एनआयएने केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.’अ‍ॅड. संदेश पाटील, एनआयएचे वकील, मुंबई. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय