शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

डोंबिवलीतील रस्ता रुंदीकरणाला मनसेचा विरोध

By admin | Updated: September 13, 2016 02:23 IST

डोंबिवलीत आॅक्टोबरपासून सुरू होणारी केडीएमसीची रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. रुंदीकरण कशाला हवे, असा सवाल करत मनसेने या मोहिमेला विरोध दर्शवला आहे.

कल्याण : डोंबिवलीत आॅक्टोबरपासून सुरू होणारी केडीएमसीची रस्ता रुंदीकरण मोहीम वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. रुंदीकरण कशाला हवे, असा सवाल करत मनसेने या मोहिमेला विरोध दर्शवला आहे. या कारवाईविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे. पालिकेने काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये शिवाजी चौक ते महात्मा फुले चौकादरम्यान रस्ता रुंद केला होता. आता डोंबिवलीतील केळकर रोड व दीनदयाळ रोडच्या रुंदीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यासाठी १ आॅक्टोबरची तारीख महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. त्यासाठी बाधित होणारे व्यापारी व रहिवासी अशा २२५ जणांना केडीएमसीने नोटिसा बजावल्या आहेत. कल्याणमध्ये कारवाईला तीव्र विरोध झाला होता, याची पुनरावृत्ती आता मनसेच्या विरोधी भूमिकेमुळे डोंबिवलीतही होण्याची दाट शक्यता आहे.केळकर रोडवर २७ इमारती आहेत. यापूर्वी या रस्त्याचे दोनदा रुंदीकरण झाले. आता पुन्हा रुंदीकरणाचा घाट घातला जाणार असल्याने व्यापारी व रहिवाशांत तीव्र नाराजी आहे. सध्या हा रस्ता १४ ते १५ मीटर रुंद आहे. तो आता १८ मीटर रुंद केला जाणार आहे. रुंदीकरणात सहा ते आठ फूट बांधकामे बाधित होणार आहे. यात काही इमारतींचे जिने तसेच कॉलमलाही धक्का बसणार आहे. यामुळे इमारतींचे बांधकाम कमकुवत होण्याची भीती बाधितांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईला मनसेने विरोध केला आहे. फेरीवाला आणि रिक्षाचालकांसाठी रुंदीकरण नको. चुकीच्या रुंदीकरणाला समर्थन देणार नाही. अगोदर दोनदा केळकर रस्त्यावर रुंदीकरण झाले. त्याचा फायदा कोणाला झाला, असा सवाल मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी उपस्थित केला आहे. रुंदीकरणाऐवजी डोंबिवलीत वाहतुकीचे धोरण ठरवा. नेहरू रोड फेरीवाल्यांना आंदण दिलाय, तो आधी मोकळा करा. ठाणे रेल्वेस्थानकाच्या धर्तीवर एकच रिक्षा स्टॅण्ड करा, अशी मागणी करताना महापालिकेची डोंबिवली विभागीय कार्यालयाची नवीन वास्तू बांधताना तेथील काही जागा वाहतुकीसाठी पार्किंगसाठी आणि रिक्षा-बस स्टॅण्डसाठी मोकळी ठेवा, अशी सूचना कदम यांनी केली आहे. रस्ता रुंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर लवकरच आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)