शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात जनतेचा जाहीरनामा

By अजित मांडके | Updated: April 2, 2024 13:54 IST

Thane News: नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत.

- अजित मांडके ठाणे -  नवी मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मीरा-भाईंदर असा ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वाहतूककोंडी, पार्किंग, हक्काचे धरण नसल्याने पाणीटंचाईसह विविध समस्या दीर्घकाळ सुटलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठाणेकरांच्या या समस्यांची चर्चा व्हावी व उमेदवारांनी या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मतदारांची अपेक्षा आहे.

बाह्यवळण रस्ता १५ वर्षे कागदावरच विविध भागांत सकाळी व सायंकाळी ठाणेकर अर्धा ते एक तास कोंडीत अडकतात. वाहनांचे पार्किंग ही गंभीर समस्या आहे.  जुन्या ठाण्याचा पुनर्विकास, वाहतूककोंडी फोडण्यासाठी घोडबंदर बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त लाभलेला नाही.  मागील १२ ते १५ वर्षांपासून या रस्त्याचे कागदी घोडे नाचविले जात आहेत. हा कोस्टल रोड १३ किमीचा आहे; तसेच तो ४० ते ४५ मीटर रुंद असणार आहे. या कामासाठी आता २,६७४ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. खारेगाव ते गायमुख असा हा मार्ग आहे. 

क्लस्टर प्रत्यक्षात केव्हा? अनधिकृत, धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांसाठी क्लस्टर योजना पुढे आणली. ठाणे महापालिका हद्दीत क्लस्टरचे ४४ यूआरपी नियोजित करण्यात आले. त्यातील पाच यूआरपीचे नकाशे अंतिम करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किसननगर भागातील पहिल्या क्लस्टरचे भूमिपूजन झाले. १९९ झोपडपट्ट्यांपैकी ११२ झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी महापालिकेने क्लस्टर योजना राबविण्याचे निश्चित केले. किसननगर भागातील क्लस्टरचे वारंवार भूमिपूजन झाले. आता कुठे योजनेचे काम सुरू झाले आहे. केवळ एका क्लस्टरने ठाण्यातील सर्व क्लस्टरचा मार्ग प्रशस्त होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

मेट्रोचे काम रखडलेवडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारचे काम कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्याचा फटका घोडबंदरवासीयांना बसत आहे. मेट्रोचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२५ डेडलाइन आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नवीन ठाणे स्टेशन १४ वर्षे लटकलेसध्याच्या ठाणे स्टेशनवरील वाढती गर्दी पाहता ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान नवीन ठाणे स्टेशनचा पर्याय आहे. मागील १४ वर्षांपासून या स्टेशनचा विकास होत आहे; परंतु अद्यापही ते स्टेशन होऊ शकले नाही. ठाणे स्टेशनवरील ताण कमी होण्यास आणखी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाऊ शकतो.हक्काचे धरण नाहीचठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या नवी मुंबई शहराच्या महापालिकेला हक्काचे धरण आहे. मीरा-भाईंदरला सूर्या प्रकल्पातून पाणी मिळणार आहे; परंतु ठाण्याची लोकसंख्या वाढत असताना हक्काचे धरण मिळू शकले नाही. कधी काळू तर कधी शाही धरणाची चर्चा होते, मात्र, अद्यापही धरण उभारणीत प्रगती नाही.जुन्या ठाण्याच्या विकासाला ब्रेकजुन्या ठाण्यात आजही अनेक धोकादायक इमारती उभ्या आहेत; परंतु त्यांच्या पुनर्विकासात अनंत अडचणी आहेत. येथील इमारतींचा पुनर्विकास व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाने नवीन ‘यूडीपीसीआर’ आणला खरा, मात्र त्यात अनेक त्रुटी असल्यामुळे हजारो रहिवासी आजही आपला जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना