शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मानाचा चषक : आमदार चषक २०१८ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:20 IST

कल्याण ग्रामीण मतदार संघातील मानाचा चषक म्हणून ओळखला जाणाऱ्या आमदार चषक २०१८ मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे कौशल्य पणाला लागले असून आता कोणता संघ बाजी मारून आमदार चषकाचा किताब मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डोंबिवली : कल्याण ग्रामीण मतदार संघातील मानाचा चषक म्हणून ओळखला जाणाऱ्या आमदार चषक २०१८ मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे कौशल्य पणाला लागले असून आता कोणता संघ बाजी मारून आमदार चषकाचा किताब मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ते १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत शीळ येथील कोडब मैदानावर ग्रामीण भागातील सर्वच संघ प्रतिभावान खेळ दाखवून संघाला विजय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या नावे असलेल्या आमदार चषक २०१८ स्पर्धेचे आयोजन शिवसेना युवासेना, अलिमकर  ११ क्रिकेट क्लब शिळगाव, गावदेवी क्रिकेट क्लब शिळगाव, एस. बी. ग्रुप यांच्या माध्यमातून करण्यात आले असून  १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन पार पडले. 

आमदार चषक २०१८ स्पर्धेत ४८ संघांनी प्रवेश घेतला असून दररोज ९ सामने खेळविण्यात येत आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक २ लक्ष ५० हजार व चषक, द्वितीय १ लक्ष ५० हजार व चषक, तृतीय ७५ हजार व चषक आणि चतुर्थ ५० हजार व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज फॉर व्हीलर गाडी, उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज टू व्हीलर बाईक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मोबाईल फोन व लकी ड्रॉ म्हणून टू व्हीलर बाईक व दररोज मोबाइल फोन ठेवण्यात आलेली आहे. आमदार चषक २०१८ स्पर्धेसाठी अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.आतापर्यंत या स्पर्धेत वाकलण, घेसर, उत्तरशीव, घारीवली व हेदुटणे हे संघ उपउपांत्य फेरीत दाख​​​​​​​​​​​​​​​ल झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक अनेक उत्कृष्ट व अष्टपैलू खेळाडू असून या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान व नवोदित खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त होत असते म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया कळवा - मुंब्रा विधानसभा युवा अधिकारी व या स्पर्धेचे आयोजक सुमित सुभाष भोईर यांनी या वेळी व्यक्त केली. 

टॅग्स :Cricketक्रिकेट