शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फी माफ : मनविसेच्या दबावाने व्यवस्थापन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 23:26 IST

फी माफ : लॉकडाऊनमुळे पालकांची परिस्थिती बिकट

भिवंडी : कोरोनामुळे शाळांची फी भरण्यास पालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र शाळांनी फी वसुलीचा तगादा लावल्याने शाळा व्यवस्थापननाने लॉकडाऊनच्या काळातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शाळा व्यवस्थापनाकडे मागणी लाऊन धरली होती. अखेर शाळा व्यवस्थापनाने नव्या शैक्षणिक वर्षातील जुलै व आॅगस्ट महिन्याची फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तब्बल ४० लाख रुपये पालक व विद्यार्थ्यांचे वाचले आहेत, अशी माहिती मनविसेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष साळवी यांनी सांगितले.

भिवंडीतील डॉ. ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश मिडीयम शाळेत चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे बिकट झाली आहे. अनेकांचा रोजगार, व्यवसाय बंद पडला आहे. त्यांच्याकडून फी घेऊ नये यासाठी साळवी यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन पाटील, योगेश धुळे व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शाळा व्यस्थापनाची भेट घेतली. पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीबाबत विवेचन करून शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी लावून धरली. या मागणीला शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कमल अग्रवाल,मुख्याध्यापक राम पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक एस.डी.धुमाळ यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून शाळेने जुलै व आॅगस्ट या महिन्यांची प्रत्येकी १००० रुपये फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची तब्बल ४० लाख रुपयांची फी माफ केली असून याबद्दल साळवी यांनी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.शाळेने पालकांकडे फीसाठी तगादा लावला होता. फी न भरल्यास विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लास आणि परीक्षा देण्याची परवानगी देणार नाही, असे पालकांनी सांगितले. अखेर, मनसेने केलेल्या मागणीनंतर शाळेने जुलै व आॅगस्ट या महिन्यांची प्रत्येकी १००० रूपये फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे पालकांना दिलासा मिळाला.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसे