लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: विवाहित असूनही पुन्हा एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाºया प्रविण सुरेश वाघेचा (३१, रा. मनिषानगर, कळवा, ठाणे) याला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली. तसेच ३० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षाही न्यायालयाने दिली.कळव्यातील मनिषानगर येथे राहणारी पिडित ३१ वर्षीय घटस्फोटीत महिला आणि मुंबईच्या अंधेरीमध्ये राहणारा प्रविण या दोघांची एका विवाह जुळविणाºया संस्थेमध्ये ओळख झाली होती. त्याची घटस्फोटाची प्रक्रीया पूर्ण झाली नव्हती. तर तिची ही प्रक्रीया पूर्ण झाली होती. तरीही त्याने विवाह झाल्याचे तिच्यापासून लपवून ठेवत तिच्याशी ओळख वाढविली. लग्नाचे अमिष दाखवून कल्याणजवळील शहाड येथील एका हॉटेलमध्ये फिरण्याच्या निमित्ताने ६ आॅक्टोंबर २०१२ रोजी तो घेऊन गेला. तिथे एका शीतपेयात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. नंतर तिचे विवस्त्र अवस्थेतील मोबाईलद्वारे चित्रणही करुन तिची फसवणूक केली. कालांतराने मात्र दोघे आंतरजातीय असल्याचे कारण दाखवित तिच्याशी कुटूंबियांच्या विरोधामुळे लग्नालाही त्याने नकार दिला. तिने अखेर याप्रकरणी २४ फेब्रुवारी २०१३ रोजी कळवा पोलीस ठाण्यात प्रविणविरुद्ध तिने लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ (इ) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर परदेशात हाँगकाँगमध्ये पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या प्रविणला तत्कालीन पोलीस निरीक्षक मुरलीधर कारकर यांच्या पथकाने मुंबईतील सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून १७ जून २०१३ रोजी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार ज्ञानेश्वर ताजणे यांनी पैरवी अधिकारी म्हणून न्यायालयात याबाबतचे पुरावे उभे केले. यातील साक्षीदार आणि सबळ पुराव्यांच्या आधारे सरकारी वकील विजय मुंढे यांनी जोरदार बाजू मांडली. त्याच आधारे न्यायालयाने प्रविणला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 18:46 IST
विवाहित असूनही पुन्हा एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाºया प्रविण सुरेश वाघेचा (३१, रा. मनिषानगर, कळवा, ठाणे) याला सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी सोमवारी सुनावली.
लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा
ठळक मुद्देठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय ३० हजारांच्या दंडाची अतिरिक्त शिक्षा