शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधांतून खून करणाऱ्या तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:00 IST

डोक्यात प्रहार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे.

ठाणे : अनैतिक संबंधांतून निर्मला सचिन यादव (४८, रा. नालासोपारा, जि. पालघर) हिचा डोक्यात प्रहार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसताना अर्धवट जळालेल्या एका कागदावरील मजकुराच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.नालासोपारा येथील मराठी भाषिक निर्मलाचा मूळच्या उत्तर प्रदेशातील सचिन यादव याच्याशी विवाह झाला होता. नालासोपाºयामध्येच तिचे किराणा मालाचे दुकान आहे. याच दुकानामध्ये सिगारेटखरेदीसाठी येणाºया अबरारशी तिची ओळख झाली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तो तिला टाळू लागला. १५ जानेवारी रोजी ती पुण्याला जाण्यासाठी निघाली, तेव्हा त्याने तिला ठाण्याच्या घोडबंदर रोडवर बोलावून घेतले. तिथे गप्पा मारण्याच्या नावाखाली तिला जंगलात फिरायला नेले. निर्जनस्थळी त्याने तिचा खून केला. नंतर, तिचा मृतदेह जाळल्यानंतर तिथून पलायन केले. १६ जानेवारी रोजी काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश ढाकणे हे घोडबंदर खिंड येथे गस्त घालत असताना त्यांना एका रहिवाशाने याबाबत माहिती दिली. त्यानुसार काशिमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे सोपवला. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर यांनी घटनास्थळी मिळालेल्या एका चिटोºयाच्या आधारे या महिलेच्या पतीचा शोध घेतला. त्याने अर्धवट जळालेले कपडे आणि पैंजणांच्या आधारे तो मृतदेह त्याची पत्नी निर्मलाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अबरारसोबत ती तिथे आल्याचे उघड झाले. तो गुलबर्गा (कर्नाटक) येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वी, सोमवारी सायंकाळी त्याला अटक केली. तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.