शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मुंबईत लागला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 22:30 IST

उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यातही ठाणे पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली.

ठळक मुद्देमुंबईतील भावाशी ठाणे पोलिसांनी घडविली भेटकळव्यातील खून प्रकरणाचा शोध घेतांना मिळाले धागेदोरेठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कळवा येथील गोळीबार प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू असताना २० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले. त्यामुळे मुंबईतच राहणा-या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.कळवा पूर्व येथील शिवाजीनगर भागातील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. त्यानंतर, दुकानातील एका कर्मचाºयाचा खून करून या चोरट्याने तिथून पलायन केले. याच प्रकरणाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माहीम दर्गा, मुंबईपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे आदींच्या पथकाने माग काढला. तेव्हा माहीम दर्गा परिसरात राहणाºया स्थानिक रहिवाशांनी या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा दोन वर्षांपूर्वी माहीम दर्गा भागात राहणारा ‘दिल्ली’नामक व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याच अनुषंगाने या पथकाने दिल्ली याचा बांद्रा, दादरसह इतर ठिकाणी शोध घेतला. तो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाकोला परिसरातील ब्रिजखाली दिसल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. त्याप्रमाणे वाकोला ब्रिज परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो या भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रिजखाली मिळाला. मात्र, त्याचा कळव्यातील मेडिकलमधील गोळीबार प्रकरणाशी संबंध नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुºहाडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळले. तो २० वर्षांपूर्वी मूळ गावाहून मुंबईत पळून आलेला होता. लहानपणी त्याच्या फतेहपूरसिक्री जिल्ह्यातील जनता (ता. बेनकी) येथून पळून आल्याचेही पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगितले. त्याने मूळगावी आईवडिलांकडे जाण्याचीही इच्छा या पथकाकडे व्यक्त केली. तेव्हा उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने दिल्ली याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, त्याचा मोठा भाऊ शफीक शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला ठाण्यातील युनिट-१ च्या कार्यालयात बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली. तो आपलाच लहान भाऊ असल्याचे शफिकने ओळखले. आपल्या लहान भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्याने घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी दिल्ली हुसेन याला त्याच्या भावाच्या ताब्यात दिले. एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना, समांतरपणे मानवतावादी दृष्टिकोन जपल्याने बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं