ठाणे: कंपनीच्या आवारातून स्टीलशिटचा माल वागळे इस्टेट येथील एका खासगी कंपनीच्या कंपाऊंडमधील एक लाख २० हजारांचे स्टील शीटच्या भागांची चोरी करणाºया सुलतान खान (५५, रा. कासारवडवली, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील सर्व ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.वागळे इस्टेट, रामनगर भागातील अनमोल फार्मा अँन्ड सन्स इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी झालेल्या मालाची भंगारात विक्रीसाठी सुलतान खान येणार असल्याची टीप श्रीनगर पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रंजना बनसोडे, पोलीस हवालदार महेश मोरे आणि पोलीस नाईक वनपाल व्हनमाने आदींच्या पथकाने सुलतान याला ३ आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे. सुलतान याने २ आॅक्टोबर रोजी रात्री ११ ते ३ आॅक्टोंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अनमोल फार्मा मशिनरी कपनीत चोरी केल्याचीही कबूली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाण्यातील कंपनीच्या आवारातून स्टीलशिटचा माल चोरणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:47 IST
वागळे इस्टेट येथील एका खासगी कंपनीच्या कंपाऊंडमधील एक लाख २० हजारांच्या स्टील शीटच्या भागांची चोरी करणा-या सुलतान खान (५५) याला श्रीनगर पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याला ठाणे न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
ठाण्यातील कंपनीच्या आवारातून स्टीलशिटचा माल चोरणाऱ्यास अटक
ठळक मुद्दे श्रीनगर पोलिसांची कारवाईएक लाखांचा मुद्देमालही हस्तगत