शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात लहान मुलांची भांडणे सोडविणाऱ्याचा कैचीने खून करणा-यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:06 IST

लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१) याची कैचीने हत्या करणाºया निहाल बेलोसे (२५) आणि आदित्य चौधरी (२५) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार यातच गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.

ठळक मुद्दे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा पाठीवर आणि बरगडीवर केले वार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१, रा. किसननगर क्रमांक ३, ठाणे) याची कैचीने हत्या करणा-या निहाल बेलोसे (२५, रा. चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे) आणि आदित्य चौधरी (२५, रा. भटवाडी, किसननगर क्रमांक ३, ठाणे) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. या दोघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथे राहणाºया चिंतन याचा आदित्य आणि निहाल या दोघांबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याची सल या दोघांच्याही मनात होती. त्यातच बुधवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची भांडणे झाली होती. हीच भांडणे चिंतन याने सोडविली. भांडणे सोडविल्याच्या रागातून आदित्य याने चिंतनला समोरून घट्ट पकडून ठेवले तर त्याचा साथीदार निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात चिंतन तिथेच रक्ताच्या थारोळयात कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेतच जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. हत्येनंतर पसार झालेल्या निहाल आणि आदित्य यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर, उपनिरीक्षक राकेश गोसावी, महेश मोरे, माणिक इंगळे, वनपाल व्हनमाने, राजू जाधव आणि निलेश धुत्रे आदींच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी मुंबईतून अटक केली. आदित्य हा बाहेरगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

* हत्येनंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हत्येनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींना शोधण्याचे आदेश त्यांनी श्रीनगर पोलिसांना दिले होते. या खूनानंतर मुंबईत पसार झालेल्या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शिताफीने अटक केली. या कारवाईनंतर पोलीस आयुक्तांनी श्रीनगर पोलिसांचे कौतुक केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र