शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एमडी पावडरची तस्करी करणाऱ्यास अटक, राजस्थानी तस्कराकडून ४८ लाखांचा माल जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: April 25, 2025 21:29 IST

ठाणे शहर परिसरात बाहेरील राज्यातील ड्रग्ज तस्कारांकडून अंमली पदार्थ विक्री होत असल्याने त्यांच्याविरूध्द कारवाईचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी दिले.

ठाणे: मेफेड्रीन (एमडी) पावडर या अमली पदार्थाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या घेवाराम पटेल (२१) या राजस्थानी तरुणाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविराेधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २४२.०९ ग्रॅम वजनाचा ४८ लाख ४१ हजार ८०० रुपयांचे एमडी हस्तगत केल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली.ठाणे शहर परिसरात बाहेरील राज्यातील ड्रग्ज तस्कारांकडून अंमली पदार्थ विक्री होत असल्याने त्यांच्याविरूध्द कारवाईचे आदेश पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे यांनी दिले. त्याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी अशा कारवाईच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या हाेत्या. याचदरम्यान ठाण्यातील गायमुख येथे काही जण एमडी पावडरच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अजय सपकाळ यांना मिळाली.१६ एप्रिल २०२५ राेजी ठाण्यातील घाेडबंदर राेड भागातील गायमुखजवळ एमडी तस्करीसाठी आलेल्या घेवाराम याला पाेलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पाेलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक राहुल मस्के आणि सहायक पाेलीस निरीक्षक निलेश माेरे यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे शहर परिसरात ड्रग्ज तस्करीचा कट पोलिसांनी उघडकीस आणला. यामध्ये आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक राजेंद्र निकम हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस