लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट येथील कोकण विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या जुन्या कार्यालयातील सहा लोखंडी कपाटांची चोरी करणाºया निलेश देवरुषी (२७, रा. केणीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांच्या मदतीने वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील सर्व लोखंडी कपाट हस्तगत केली आहेत.वागळे इस्टेट येथील विभागीय कृषी सहसंचालक तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या जुन्या बंद असलेल्या पडीक कार्यालयातून २२ डिसेंबर २०२० ते ८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये सहा लोखंडी कपाट आणि नॉयलॉनची जाळी असलेल्या दोन लोखंडी खुर्च्या निलेशने चोरल्या होत्या. हा चोरलेला मुद्देमाल तो श्रीनगर परिसरात विक्रीसाठी आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर श्रीनगर पोलिसांनी त्याला संशयावरुन ताब्यात घेतले. हा मुद्देमाल चोरीचा असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी ९ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कृषी विभागाचे लिपीक आशिष मेश्राम यांनी गुन्हा दाखल केला असून निलेशला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ठाण्यातील जुन्या जिल्हा कृषी कार्यालयात चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 21:41 IST
वागळे इस्टेट येथील कोकण विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या जुन्या कार्यालयातील सहा लोखंडी कपाटांची चोरी करणाºया निलेश देवरुषी (२७, रा. केणीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला श्रीनगर पोलिसांच्या मदतीने वागळे इस्टेट पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
ठाण्यातील जुन्या जिल्हा कृषी कार्यालयात चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक
ठळक मुद्देसहा लोखंडी कपाटांची चोरीश्रीनगर पोलिसांनी केली उघड