शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात अपघातांची मालिका, अपूर्ण रस्ता, बेशिस्त ठरते कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:32 IST

राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट ते टोकावडे या ३० ते ३५ किमीच्या रस्त्यामध्ये दरोरोज कुठेना कुठे अपघात घडतच असतो, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र माळशेज घाट हे वारंवार त्यांच्यावर लक्ष ठेवून असते.

टोकावडे - राष्ट्रीय महामार्ग ६१ कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाट ते टोकावडे या ३० ते ३५ किमीच्या रस्त्यामध्ये दरोरोज कुठेना कुठे अपघात घडतच असतो, हे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र माळशेज घाट हे वारंवार त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. पण काही ठिकाणी वाहनचालक वेगवान वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देतात. माळशेज घाट ये-जा करत आसताना अनेक ठिकाणी गो-फाॅर स्लो असे बोर्ड लावलेले दिसतात, मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करत वाहने वेगवान चालवतात.माळशेज घाटामध्ये दोन महिन्यांपासून घाटातील दोन धोकादायक वळणांवर सिमेंट काॅंक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असून ते काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी एकेरी वाहतूक दरोरोज सुरू असते. त्यामुळे या परिसरात अपघात होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यातच माहामार्ग पोलीस यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. ते वाहनचालकांना विशिष्ट मार्गदर्शन करत आहेत. तसेच वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कार वाहनचालकांवर नजर ठेवून आहे. त्यामुळे अपघात कमी होणार असल्याचे दिसत आहे. धिम्या गतीने सुरू असल्याने सिमेंट काॅंक्रिट रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल वाहनचालक विचारत आहेत. आम्ही या माळशेज घाटमार्गे दररोज मुंबई येथे भाजीपाला घेऊन जात असतो. मात्र या घाटात दाेन महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक काही वेळ विस्कळीत होते. ते काम लवकर पूर्ण व्हावे, असे वाहनचालक रामचंद्र वायाल यांनी सांगितले. ट्रकला अपघातटोकावडे : माळशेज घाटात सिमेंट ट्रक उलटून चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माळशेज घाटातील सावणे गावच्या वरच्या वळणावर सिमेंट रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तेथे सिमेंट मिक्सर खाली करून जात असताना मोरोशी येथील वळणावर उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत दररोज अनेक वाहनचालकांना वाहन चालवताना वळणावर सावकाश जावे, असे आवाहन करत केले जाते. मात्र, वाहनचालक सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अपघात घडत आहेत.- किरण मतकर, सहायक पाेलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस, माळशेज

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे