शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

माळशेज पर्यटनाची नवी ओळख ‘थितबी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 01:34 IST

वन पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना : पर्यटकांना पाडणार भुरळ, निसर्गाचा घेता येणार आनंद

पंकज पाटील 

बदलापूर : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटात हजारो पर्यटकांची वर्दळ असते. माळशेज घाटात आता विकासकामेही सुरू झाली आहेत. माळशेज पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असताना आता माळशेजच्या पर्यटन क्षेत्रात वनविभागानेही मोठी भर घातली आहे. वन पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना माळशेज घाटाच्या पायथ्याची तयार करण्यात आला आहे. खोल दरीत अत्यंत सुबकतेने थितबी वन पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. आता पर्यटकांची या ठिकाणीही गर्दी वाढत आहे. सोबत बारमाही पर्यटनाच्या केंद्रस्थानी आता थितबी राहणार आहे. आताच्या माळशेज घाट रस्त्याच्या खालच्या दरीतून जुना घाटमार्ग जातो. माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी गावाजवळून वाहणाºया काळू नदीच्या पात्राजवळ हा प्राचीन मार्ग आहे. अजूनही अनेक हौशी पर्यटक या मार्गाने जातात. आमदार किसन कथोरे यांनी या परिसराचे महत्त्व ओळखून येथे बारमाही पर्यटनासाठी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले. वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय नावीन्यपूर्ण उपक्र मांतर्गत राबविण्यात आलेला ‘थितबी पर्यटन ग्राम विकास प्रकल्प’ त्यातूनच साकारला आहे.

थितबी गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर काळू नदीच्या काठी वन विभागाने तंबू आणि कंटेनर निवासाची सोय केली आहे. तिथून उंच डोंगरावरून कोसळणारे शुभ्र पांढºया फेसाळत्या पाण्याचे धबधबे न्याहाळता येतात. दरीत वाºयाचा दाब इतका प्रचंड असतो की, धबधब्यातील पाण्याचा प्रवाहही त्यामुळे वर ढकलल्यासारखा दिसतो. पावसाळ्याप्रमाणेच थंडी किंवा उन्हाळ्यातही येथील निसर्गसांैदर्य पाहण्यासाठी पर्यटक येतात.कल्याण-नगर महामार्गावर घाट सुरू होण्याआधी एक लहान रस्ता थितबी गावाकडे जातो. याच गावातून पुढे वाहन घेऊन पर्यटन केंद्रापर्यंत पोहोचता येते.काही पर्यटक गाडी गावातच उभी करून जंगल सफारी करत या ठिकाणी पोहोचतात. पायवाटेवर अनेक ठिकाणी ओढे वाहत असल्याने या ओढ्यातून मार्ग काढत पोहोचण्याचा आनंद वेगळा आहे. थितबीच्या स्थानिक ग्रामस्थांकडे या पर्यटनस्थळाचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याठिकाणी रिव्हर क्र ॉसिंगसारखे साहसी खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी वॉल क्लायम्बिंग, रोप क्लायम्बिंग आणि इतर साहसी खेळ सुरू करण्यात आले आहे.जंगलातून जाण्यासाठी गाडीची सोय : थितबीचा प्रवास तसा अवघड असला तरी ज्या पर्यटकांना जंगलातून चालणे शक्य नाही, त्यांना गाडीची सोयही करण्यात आली आहे किंवा पर्यटक स्वत: गाडी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. हे ठिकाण माळशेज घाटातून खाली कोसळणारे धबधबे ज्या दोन मोठ्या ओढ्यांतून वाहतात, त्या दोन ओढ्यांच्या मध्यभागी या ठिकाणी विकसित केले आहे.

टॅग्स :thaneठाणेtourismपर्यटन