शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुकान विक्रीच्या नावाखाली मालाडच्या व्यावसायिकाची ३५ लाखांची रोकड ठाण्यातून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:12 IST

ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणचे एक हॉटेल कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून मालाड येथील एका व्यावसायिकाचे ३५ लाख रुपये घेऊन पळवून नेल्याचा प्रकार ठाण्यात घडला.

ठळक मुद्देकमी किमतीत दुकान देण्याचे आमिषचार आरोपींवर संशयचितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : एका दुकान विक्रीच्या नावाखाली मालाड येथील व्यावसायिकास ठाण्यात बोलावून त्याची ३५ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींविरूद्ध चितळसर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.मालाड येथील रहिवासी आनंद मिश्रा यांचा डिजीटल न्यूज चॅनलचा व्यवसाय आहे. संतोष शिवनारायण गुप्ता हे त्यांचे परिचित असून, मिश्रा यांना त्यांच्या व्यवसायात गुप्ता यांची नेहमी मदत होत असते. ठाण्यातील मानपाडा येथील हॉटेल रामजीच्या मालकावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले असून, त्यांनी त्यांचे हॉटेल दीड कोटी रुपयात विक्रीस काढले असल्याचे प्रॉपर्टी एजंट गोपाल याने संतोष गुप्ता यांना साधारणत: महिनाभरापूर्वी सांगितले होते. गुप्ता यांनी ही माहिती आनंद मिश्रा यांनी सांगितली. मिश्रा यांना हा व्यवहार फायद्याचा वाटल्याने त्यांनी यात रूची दाखवली. व्यवहाराची माहिती घेण्यासाठी मिश्रा काहीवेळा गुप्ता यांच्या मोबाईल फोनवरून गोपालशी बोलले. १४ जून रोजी गोपालने मिश्रा यांच्याशी संपर्क साधून हॉटेल पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार आनंद मिश्रा आणि संतोष गुप्ता हे हॉटेल पाहण्यासाठी ठाण्यात पोहोचले असता, गोपालने प्रकृती ठिक नसल्याचा बहाणा करून हॉटेल स्वत:च पाहण्यास सांगितले. मिश्रा यांनी हॉटेल पाहिले असता, त्यांना ते आवडले. त्यांनी तसे गोपालला लगेच कळवले. दुसर्‍या दिवशी १५ जून रोजी गोपालने संतोष गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. हॉटेल रामजीचे मालक त्यांच्या वकिलाला सोबत घेऊन व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी येणार असून, आपण टोकणची रक्कम घेऊन ठाण्याला या, असे त्याने संतोष गुप्ता यांना कळवले. त्यानुसार ३५ लाख रुपये घेऊन आनंद मिश्रा आणि संतोष गुप्ता हे ठाण्यात आले. ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी गोपालशी संपर्क साधला. त्याने प्रकृती अस्वास्थाचा बहाणा केला. आपला मित्र शहा याला तुमच्याकडे पाठवत असून, त्याच्यासोबत माझ्या कार्यालयावर या, असा निरोप त्याने मिश्रा यांना दिला. त्यानुसार मिश्रा, गुप्ता आणि शहा एका कारने गोपालच्या कार्यालयाकडे निघाले. काही अंतरावर एका वळणावर शहा पैशाची बॅग घेऊन अचानक कारमधून उतरला. जवळच उभ्या असलेल्या दुसर्‍या एका कारने त्याने पळ काढला. मिश्रा यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुसाट वेगात पळून गेला. त्यानंतर मिश्रा यांनी चितळसर पोलीस ठाणे गाठून झाला प्रकार पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गोपाल, शहा आणि अन्य दोन आरोपींविरूद्ध शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठाण्यातील हॉटेल रामजीच्या मालकावर कोणतेही कर्ज नाही. केवळ तक्रारदाराला लुबाडण्यासाठी आरोपींनी हा बनाव रचला होता. आरोपींचा शोध सुरू आहे. मिश्रा यांचा सहकारी संतोष गुप्ता यांची या प्रकरणामध्ये नेमकी भूमिका काय आहे, हेदेखील तपासले जाईल.सुनील घुगेपोलीस निरीक्षक, चितळसर पोलीस ठाणे

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस