शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बनावट सोन्याचे दागिने बनवून फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणा-या गुन्हेगारांना कळवा पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 17:43 IST

सोन्याच्या दागिन्यांमध्ये चांदी मिसळणा-या आरोपींना अटक केली आहे.

ठाणे :- कोकणामध्ये लग्नात किंवा इतर समारंभात सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घालण्याची काही जणांना सवय असते , तीन-चार तोळ्याच्या दागिन्यांमध्ये चांदी मिक्स करून त्यांचे दहा-बारा तोळे बनवून चारचौघात मिरवणाऱ्या लोकांसाठी बनावट सोनं बनवण्याचं काम रासबिहारी नीता इमन्ना वय 34 राहणार चिपळूण हा करत असे. व्यवसायाने सोनार असणाऱ्या रासबिहारी ईमन्ना याने शक्कल लढवत अशा प्रकारचे 1000 ग्रॅम वजनाचे दागिने बनवून ठेवले, त्यानंतर त्याने सुशांत साळवी (वय 35 रा. मनीषा नगर कळवा), लियाकत अब्दुल कादीर शेख (वय 43 ,रा. एरोली नवी मुंबई 3), अनिकेत चंद्रकांत कदम (वय 34, रा. चिपळूण रत्नागिरी) यांचा मध्यस्थी म्हणून वापर करून त्यांच्यामार्फत फायनान्स कंपन्यांकडे असे भेसळ केलेल सोनं गहाण ठेवून पैसे उचलत असे, उचललेली रक्कम ही गहाण ठेवलेल्या सोन्यापेक्षा जास्त असल्यामुळे परत सोने सोडवण्यासाठी जात नसत, मिळालेले पैसे आपापसात वाटून घेत असत, हे प्रकरण उघडकीस येण्यामागे कळवा येथील एक 420चा एक गुन्हा कारणीभूत ठरला, एका महिला तक्रारदाराने सुशांत निशिकांत साळवी या इसमाने आपल्याला 81 ग्रॅम वजनाचे दागिने 23 कॅरेट्स असल्याचे भासवित आपल्याकडून 1,70,000 हजार रुपये घेतले, काही दिवसांनी दागिन्यांची पडताळणी केली असता ते खोटे असल्याचे तिला समजले. त्याप्रमाणे तिने कळवा पोलीस स्टेशनमध्ये 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सुशांत साळवी याला ताब्यात घेतले असता, ह्यामध्ये चार जणांचे रॅकेट असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यामध्ये आरोपी रासबिहारी नीता इमन्ना याने चिपळूण येथील त्याच्या गावी 1000 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तयार केलेले होते, त्या पैकी 688 ग्रॅम वजनाचे सोने, पॉलीश केलेले सोन्याचे दागिने साथीदारांच्या मदतीने रत्नागिरी, मुंबई, ठाणे परिसरात एकूण 7 ठिकाणी फसवणूक करून मुथुट फायनान्स कळवा, नौपाडा, दादर , माझगाव, रत्नागिरी येथील लक्ष्मी बाळासाहेब नागरी सहकारी पतसंस्था, यादव राव घाग ग्रामीण शेती सहकारी संस्था अशा सोनं गहाण ठेवणाऱ्या संस्थांना बनावट सोन्याचे दागिने देऊन 13,45,000 /- रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. इमन्ना याच्या रत्नागिरी येथील गाळ्यातून 551 ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले बनावट दागिने व 1,50,000 रुपये रोख व बनावटीकरणाचे साहित्य 48 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत केल्याचे ठाणे परिमंडळ 1 उपायुक्त डॉ.स्वामी यांनी सांगितले.

टॅग्स :Goldसोनं