शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2018 : बच्चे कंपनीने लुटला पतंग महोत्सवाचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 14:43 IST

डोंबिवली- वेगवेगळ्या डिझाईनचे, आकाराचे आणि रंगाचे पतंग आकाशात उंच उंच उडताना पाहून बच्चे कंपनीने आनंद लुटला. निमित्त होते ते मेरा बचपन किंडर गार्डन्स या स्कूलच्या विद्याथ्र्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे. भागशाळा मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतर्फे प्रथमच अश्या महोत्सवाचे आयोजन केले होते. ‘प्ले ग्रुप’पासून ‘सिनियर केजी’ च्या ...

डोंबिवली- वेगवेगळ्या डिझाईनचे, आकाराचे आणि रंगाचे पतंग आकाशात उंच उंच उडताना पाहून बच्चे कंपनीने आनंद लुटला. निमित्त होते ते मेरा बचपन किंडर गार्डन्स या स्कूलच्या विद्याथ्र्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पतंग महोत्सवाचे. भागशाळा मैदानात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतर्फे प्रथमच अश्या महोत्सवाचे आयोजन केले होते. ‘प्ले ग्रुप’पासून ‘सिनियर केजी’ च्या मुलांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. एकूण 56 विद्याथ्र्यानी पतंग उडविण्याची मजा लुटली. लहान मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा, त्यांना केवळ पुस्तकी शिक्षण दिले जाऊ नये, तर स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. पतंग महोत्सवासोबतच तिळगूळ समारंभ ही यावेळी पार पडला. मुलांना पतंग उडविण्यासाठी त्यांच्या पालकांनी मदत केली. पतंग महोत्सवातून आज लहानग्याना ही पतंग उडविण्याची मजा लुटता आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरूण हेडाऊ, संघाचे माजी अध्यक्ष प्रभाकर खटी, शाहू भोसले, कमलाकर जकातदार, वैद्यनाथ मिश्र, शाळेचे चेअरमन गणोश भोईर, मुख्याध्यापिका प्रतिभा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.  

अरूण हेडाऊ म्हणाले, जानेवारी महिन्यातील मकरसंक्रात हा पहिला सण आहे. या सणाच्या निमित्ताने स्नेह वृध्दींगत व्हावा आणि तिळगूळाचा गोडवा कायम राहावा. पतंग उडविणो हा खेळ एक मनोरंजनाचा भाग आहे. त्यासाठी पतंग नक्की उडावा. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या व वाईट बाजू असतात. पतंग उडविल्यामुळे पक्ष्यांना इजा होते. परंतु विमानाची ही पक्ष्यांना धडक लागून अपघात होत असतात म्हणून काय  विमानसेवा बंद होत नाही. पतंग महोत्सव साजरा करताना पक्ष्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सणाचा ही आनंद लुटावा असे त्यांनी सांगितले.

पतंग चीनमधून भारतात आली.अमेरिकेत रेशमी कापड आणि प्लॉस्टिकपासून बनवलेले पतंग उडविले जातात. भारतात ही पतंग उडविण्याची आवड हजारो वर्ष जुनी आहे. चीनच्या बौध्द तीर्थयात्रिका यांच्या माध्यमातून पतंग उडविण्याचा खेळ भारतात पोहोचला. मुगल बादशहाच्या काळापासून पतंग मोठय़ा आवडीने उडविला जातो. गुजरातमध्ये दरवर्षी 14 जानेवारीला पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. याच पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात देखील मकारसंक्रातीला पतंग उडवून या खेळाचा आनंद लुटला जातो. लहानपासून मोठय़ार्पयत सर्वानाचा पतंग उडविण्याचा मोह आवरता येत नाही.  

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८