शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

पत्रकारितेचा वसा श्वासाइतका सांभाळा

By admin | Updated: January 4, 2016 01:55 IST

‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी,

ठाणे : ‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी, अशी अपेक्षा कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केली. सिध्दी फ्रेण्ड्स पब्लिकेशनतर्फे साहित्यिक विनोद पितळे यांच्या ‘बायलाईन व आयटम’ या कोळीगीतांच्या आॅडिओ सीडीचे प्रकाशनावेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ते बागवे बोलत होते. यावेळी अक्षर सिध्दी नववर्ष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बागवे यांनी पत्रकार हे खुप क्रिएटिव्ह असतात; परंतु कारंज्याला जसे कुंपण असते तसेच पत्रकाराला वेळेची, शब्दांची मर्यादा असते. त्यामुळे एखाद्या कलाकाराप्रमाणे त्याला चिंतन करता येत नसल्याचे सांगून पत्रकाराला प्रतिभा आणि प्रज्ञा म्हणजेच बुद्धीचा वापर एकाचवे ळी करता येतो. याचे कौतुक आम्हा कलाकरांना वाटते, असेही बागवे यांनी नमूद केले. कुसुमाग्रज हे देखील पत्रकार होते आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे रात्रपाळीची पत्रकारिता करताना सुचले होते, ही आठवण त्यांनी सांगितली. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी नवीन पत्रकारांनी अवतीभवती चौकसपणे बघावे आणि संतासारखे वागू नये, असा सल्ला दिला.यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पर्यावरणाचा व्हास होऊ नये यासाठी सरकारकडे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला कसाब भारतात येणार असल्याचे चार दिवसापूर्वीच कळले होते आणि तसे निरोपही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना देण्यात आले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोळी समाज मुंबईतून हद्दपार झाला तर मुंबई उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, संगीतकार मंगेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.