शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मॅडम, फिर आऊ क्या काम करने?; पैसे नसल्याने घरकाम करणाऱ्या महिलांची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 00:43 IST

जीवावर उदार होऊन महिलांची घरकामावर जायची तयारी

- स्नेहा पावसकर ठाणे : मॅडम, फिर आऊ क्याँ काम करने? काम की जरूरत है... असे फोन हल्ली करत आहेत, त्या घरकामगार महिला. पहिल्या लॉकडाउननंतर घरकामे बंद होऊन महिना लोटला. परिणामी, रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या घरकामगार महिला आता कोरोनाची भीती असली, तरी जीवावर उदार होऊन पोटासाठी काम करायला घराबाहेर पडण्याची तयारी दाखवत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाला घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. पहिला लॉकडाउन जाहीर करून एक महिना होऊन गेला. तेव्हापासून घरकाम करणाऱ्या महिलांना काम बंद करावे लागले होते. मात्र, आता लॉकडाउनही वाढवला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामे अद्यापही बंद आहेत. हे काम महिनाभर बंद असल्याने हातावर पोट असलेल्या अन्य कामगारांप्रमाणे घरकामगार महिलांचेही हाल झाले आहेत. मार्च महिन्यातील अर्धे दिवस काम करूनही लॉकडाउनमुळे त्यांना पगार मिळालेला नाही, तर जवळपास संपूर्ण एप्रिल महिना त्यांना घरीच थांबावे लागल्याने या महिन्याचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आता घर कसे चालवायचे, हाताशी थोडीफार जमापुंजी असली तरी ती आता खर्च केली, तर येणाºया दिवसांत कशी गुजराण करायची, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे आता कोरोनाची भीती दूर ठेवत पोटासाठी या घरकामगार महिला घराबाहेर पडून पुन्हा दोन घरची धुणीभांडी, जेवण करण्याची तयारी दाखवत आहेत. अनेक जणींनी काम करत असलेल्या मालकांना फोन करून काम करने आऊ क्याँ मॅडम, घर मे पैसे की जरूरत है..., काम चाहिये असे विचारू लागल्या आहेत. मात्र, आता अनेक सोसायट्यांनी बाहेरील व्यक्तींना सोसायटीत प्रवेश बंद केल्याने सध्या तरी त्यांना कामावर येऊ नका, असेच मालकांकडून सांगितले जात आहे.ठाणे शहरात नोंदणीकृत हजार-दीड हजार घरकामगार महिला आहेत. यापैकी केवळ पाच टक्के महिलांनाच मालकांनी पगार किंवा मदत म्हणून पैसे बँकेत पाठवून त्यांची सोय केली आहे. उर्वरित महिलांना पैसे देणे तर सोडा, साधी विचारपूसही केलेली नाही, अशी माहिती काहींनी दिली. वाईट परिस्थिती असलेल्या घरकामगार महिलांसाठी नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स मूव्हमेंट या संघटनेतर्फेही मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत.लॉकडाउननंतर रोजगार बंद झाल्याने अनेक घरकामगार महिलांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे आता जीवाची पर्वा न करता पोटासाठी त्या पुन्हा काम करू इच्छित आहेत. मात्र, आता कोरोनाच्या भीतीने त्यांना इतक्यात सोसायटीत प्रवेश दिला जाणार नाही. आम्ही संस्थेतर्फे सर्व महिलांना टप्प्याटप्प्याने जीवनावश्यक वस्तू पुरवणार आहोत. मात्र, ही मदत तुटपुंजीच आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडूनही मदत होण्याची गरज आहे.- रेखा जाधव, ठाणे जिल्हा समन्वयक, नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स मूव्हमेंट लि.